
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
गुनाट, ता. २५ : गुणवंत विद्यार्थ्यांना बांधलेले मानाचे फेटे, मिळालेल्या यशाबद्दल दिलेल्या चकाकणाऱ्या ट्रॉफी, ग्रामस्थांची मिळालेली कौतुकाची थाप आणि आपल्या पाल्याच्या कौतुक सोहळ्याने भारावून गेलेले पालक. असे विलोभनीय दृश्य निमोणे (ता. शिरूर) येथे पाहायला मिळाले. निमित्त होते, निमोणे व परिसरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत, त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी करिअर विषयक मार्गदर्शन व्हावे, यासाठी निमोणे (ता. शिरूर) येथील निमोणे आयडॉल ग्रुपने ‘गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यंदाचे त्यांचे हे पाचवे वर्ष आहे. या वर्षीही ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
‘‘आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता अफाट आहे, फक्त त्यास योग्य दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी पालकवर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत शिरूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी व्यक्त केले.
सरपंच संजय काळे, शिरूरचे पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, फौजदार शंकर चव्हाण, निमोणे आयडॉलचे बाळासाहेब गायकवाड, शाम जगताप, संजय गाडेकर, नवनाथ गव्हाणे, रोहिदास काळे, प्रकाश दुर्गे, आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्राध्यापक गौतम दळवी यांनी सूत्रसंचालन केले.
निमोणे (ता. शिरूर) : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर व ग्रामस्थ.
कोड;- gun25p1
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d83060 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..