अंगणवाड्यांना पायाभूत सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाड्यांना पायाभूत सुविधा
अंगणवाड्यांना पायाभूत सुविधा

अंगणवाड्यांना पायाभूत सुविधा

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी आणि शौचालयांची कायमस्वरूपी सोय करून देण्याबरोबरच प्रत्येक अंगणवाडीला विविध प्रकारच्या ३२ पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये वीज, पिण्याचे पाणी, शौचालये आदी प्रमुख सुविधांचा समावेश आहे, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी अंगणवाड्यांच्या विकासासाठीच्या ‘दहा कलमी कार्यक्रमा’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांसाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना प्राप्त झालेल्या निधीचा वापर केला जाणार आहे.
अंगणवाड्यांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्ह्यात अंगणवाडी सुधारणा कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे गॅप फिलींग सर्वेक्षण केले आहे. त्याआधारे प्रत्येक अंगणवाडीत पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी आणि शौचालये उभारणी आदी पायाभूत सुविधांसह अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आपापल्या गावातील अंगणवाडीला आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे बंधन ग्रामपंचायतींवर घालण्यात आले आहे. त्यासाठी ‘आमचा गाव, आमचा विकास’ या आराखड्यामध्ये अंगणवाडी केंद्राच्या कामांचा समावेश करण्यासाठी आवश्‍यक बदल करण्यासाठी ग्रामपंचायतींना परवानगी दिलेली आहे.

अंगणवाड्यांत उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधा
- पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी
- बोलक्या भिंती करणे व पंखा लावणे
- ई-लर्निंगसाठी एलईडी टीव्ही लावणे
- बालकांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या उपलब्ध करून देणे
- अंगणवाडी केंद्रात वॉश बेसिन लावणे
- वॉटर प्युरिफायर लावणे
- धान्य कोठ्या उपलब्ध करून देणे
- इमारतीवर अंगणवाडीच्या नावाचा फलक लावणे
- अग्निशामक यंत्रणा बसविणे
- डिस्प्ले बोर्ड लावणे

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या- ४५००
२२ पायाभूत सुविधा दिल्या जाणाऱ्या अंगणवाड्या- २५७१
पायाभूत सुविधांअभावी शिल्लक राहणाऱ्या अंगणवाड्या- १९२९

अंगणवाड्यांची तालुकानिहाय संख्या
आंबेगाव- १८९, बारामती- २४९, भोर- २६७, दौंड- २१८, हवेली- ११२, इंदापूर- १८३, जुन्नर- १४१, शिरूर- १८२, पुरंदर- २५७, खेड- १५७, मावळ- ३३७, मुळशी- १७२ आणि वेल्हे- १०७.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d83195 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top