
हेरिटेज स्कूलमध्ये ‘स्नेक्स क्ले मॉडेलिंग’
पिरंगुट, ता. ३ ः कासार अंबोली (ता. मुळशी) येथील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमधील पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमी साजरी केली.
यावेळी मुलांनी सापांशी संबंधित शॉर्टफिल्म पाहण्याचा तसेच ''स्नेक्स क्ले मॉडेलिंग'' या ॲक्टिविटीचा आनंदही घेतला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या हातावर मेहंदी लावल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला.
निसर्गाच्या अन्नसाखळीतील सापांचे महत्त्व आणि सापांना शेतकऱ्यांचे मित्र का म्हटले जाते आणि त्यांना मारण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आपण त्यांना सोडले पाहिजे याविषयी मुलांना जागरूक करण्यासाठी हा दिवस खास साजरा करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका रेणू पाटील यांनी नमूद केले.
हेरिटेज स्कूलचे व्यवस्थापन सदस्य, संस्थापक- अध्यक्ष कृष्णा भिलारे, सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, यशस्विनी प्रशासक व्यवस्थापक भिलारे यांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल कौतुक केले.
82184
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d86470 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..