सेंद्रिय खताच्या जोरावर ९२ टन उसाचे उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंद्रिय खताच्या जोरावर ९२ टन उसाचे उत्पादन
सेंद्रिय खताच्या जोरावर ९२ टन उसाचे उत्पादन

सेंद्रिय खताच्या जोरावर ९२ टन उसाचे उत्पादन

sakal_logo
By

गुनाट, ता. ६ : गुनाट (ता. शिरूर) येथील अनिल घावटे या ऊस उत्पादक शेतकऱ्याने तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर केला. यामुळे एकरी आकराच महिन्यांत सुमारे ९२ टन असे उसाचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यांच्या उसाला २५ ते ३० कांड्यावर आहेत. कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याने इतर शेतकऱ्यांसाठी तो मार्गदर्शक ठरत आहे.


लागवडीसाठी कुटुंबातील सदस्यांनी पुढकार घेतला. यामुळे मजुरीवरील खर्च वाचला. लागवडीपूर्वीच सऱ्यांच्यामध्ये शेणखत टाकले. तर बांधणीच्या वेळीही कोंबड खत, गांडूळ खत, निंबोळी पेंड अशा सेंद्रिय खतांवर जास्त भर दिला. रासायनिक खतांचा वापर केवळ बेसल डोस देण्याकरिता केला. उसातील तणनाशकाच्या नियंत्रणासाठी महागड्या फवारण्या घेण्यापेक्षा घरगुती ट्रॅक्टरचा वापर केला. हुमणी व खोड किडीच्या नियंत्रणासाठी अत्यल्प दारात मिळणाऱ्या वसंतदादा शुगर इंस्टीट्युटच्या औषधांना प्राधान्य दिले. पिकासाठी अत्यावश्यक असणाऱ्या आळवणी व फवारणीचे ही वेळापत्रक बनवून ते आमलात आणले. परिपूर्ण नियोजनामुळेच घावटे यांचा आकरा महिन्याचे ऊस तब्बल ९२ टन निघाले. नुकताच हा ऊस परिसरातील गुऱ्हाळाला देण्यात आला. त्यास २२०० रुपयांचा बाजारभाव मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

ऊसासाठी खते, औषधांच्या नियोजनाबरोबरच पाण्याचे नियोजनही महत्वाचे असते. बऱ्याचदा पाण्याची अडचण निर्माण झाल्याने त्याचा विपरित परिणाम ऊस वाढीवर व उत्पादनावर होतो. त्यामुळेच कमी कालावधीत ऊसाची जास्त काळजी घेऊन उत्पादनवाढीवर भर देण्याचा प्रयत्न असतो. पाण्याची अडचण नसती तर एकरी १२० टनांपर्यंत उत्पादन काढण्याचा मानस आहे.
- अनिल घावटे, ऊस उत्पादक शेतकरी

एक डोळा ऊस लागवडीला प्राधान्य
सध्या शेतमजुरांची वाढलेली मजुरी, खते व औषधांच्या वाढलेल्या किमती व त्यामानाने एकरी कमी निघणारे उत्पादन यातुन मार्ग काढण्यासाठी घावटे यांनी मोबाईलच्या यु ट्यूबवर ऊस पिकाचा अभ्यास केला. दोन डोळे ऊस लागवडीऐवजी एक डोळा ऊस लागवडीला प्राधान्य दिले. शिवाय दोन कांड्यामधील अंतर हे दोन ते अडीच फुटांच्या दरम्यान ठेवले. त्यामुळे कमी बियाणांमध्येच ऊसाची लागवड झाली.


82246

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d86587 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..