जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या पूर्ण
जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यात ८८ टक्के पेरण्या पूर्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ६ पुणे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या १ लाख ७२ हजार ३२ हेक्टर क्षेत्रावर पूर्ण झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्यांचे हे प्रमाण एकूण सरासरी क्षेत्राच्या ८८ टक्के इतके झाले आहे. यंदाच्या खरिपात आतापर्यंत सर्वाधिक पेरण्या जुन्नर तालुक्यात २७ हजार २९६ हेक्टर क्षेत्रावर झाल्या असून, सर्वांत कमी हवेली तालुक्यात म्हणजे केवळ ३ हजार ४८९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

यंदाच्या खरीप हंगामात पाऊस पडण्यास उशीर झाल्याने कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाच्या सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकांच्या पेरण्या या जिल्ह्यातील सोयाबीन पिकाच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत यंदा दुप्पटीहून अधिक झाल्या आहेत. जिल्ह्याचे सोयाबीन पिकाचे एकूण सरासरी क्षेत्र हे २० हजार ९८२ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत ४३ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रावर सोयबीन पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. या पिकाचे पेरण्यांचे प्रमाण हे या पिकाच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या २०९ टक्के इतके झाले आहे.

पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र हे १ लाख ९५ हजार ७१० हेक्टर इतके आहे. यामध्ये भाताचे एकूण सरासरी क्षेत्र हे सर्वाधिक ५९ हजार ६२७ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा पूर्ण कोरडा गेला आहे. यामुळे भाताच्या रोपवाटिका टाकण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला होता. परिणामी यंदा भात लावणीस उशिरा सुरवात झाली. आतापर्यंत ४९ हजार २६४ हेक्टर क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली आहे. भात लावणीचे हे प्रमाण भात पिकाच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या ८३ टक्के इतके असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी शुक्रवारी (ता.५) सांगितले.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पाच जुलैपासून पाऊस पडण्यास सुरवात झाली आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली होती. जिल्ह्यात खरीप हंगामात जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.

पीकनिहाय पेरणी झालेले क्षेत्र हेक्टरमध्ये (कंसात टक्केवारी)

सोयाबीन --- ४३ हजार ७८३ (२०९ टक्के)
बाजरी --- ३२ हजार ८९० (६९ टक्के)
भात --- ४९ हजार २६४ (८३ टक्के)
मका --- १८ हजार ५८८ (९९ टक्के)
मूग --- ८ हजार ६६० (५८ टक्के)
भुईमूग --- ५ हजार ८९६ (३८ टक्के)


पुणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाला आहे. यामुळे जिल्हात खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून चांगला वेग आला होता. यामुळे गेल्या अवघ्या तीन आठवड्यात खरीप पेरण्यांचे प्रमाण हे ८८ टक्क्यांवर पोहोचले आहे. यंदाच्या खरीप हंगामात भात लावणीस थोडा उशीर झाला. पण भात लावणी वेगात पूर्ण झाली आहे. यंदा सर्वाधिक पेरण्या या सोयाबीनच्या झाल्या आहेत.
- ज्ञानेश्‍वर बोटे,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d87276 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..