मोटेवाडी तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटेवाडी तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
मोटेवाडी तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

मोटेवाडी तलाव भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

sakal_logo
By

गुनाट, ता. १२ : चासकमानचे आवर्तन आणि सततच्या पावसामुळे तालुक्यातील पाणीसाठवणुकीच्या क्षमतेच्या दृष्टीने मोठ्या तलावांपैकी एक असणाऱ्या मोटेवाडी (ता. शिरूर) तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच हा तलाव भरला आहे. त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या लंघेवाडी, मोटेवाडी, चव्हाणवाडी, निमोणे, दुर्गेवस्ती येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या गावांच्या शेतीचा पाणीपुरवठा योजना या तलावावरून नेण्यात आल्या. त्यामुळे या तलावातील पाण्यावर १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. परिणामी तलावातील पाणीसाठ्यावरच येथील शेतकऱ्यांच्या कांदा, ऊस, आदी मुख्य शेतीपिकांचे नियोजन ठरलेले असते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा नेहमीच या तलावातील पाणीसाठ्याकडे असतात. सुदैवाने यावर्षी चासकमान धरण क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस व त्यामुळे धरणातील अतिरिक्त पाणी पातळी, तलावात सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पहिल्याच टप्प्यात चासकमानचे पाणी मोटेवाडी तलावात सोडण्यात आले. त्याचदरम्यान पावसानेही या भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मोटेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले.
मोटेवाडी (ता. शिरूर) : पूर्ण क्षमतेने भरलेला मोटेवाडी तलाव.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d89340 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..