मॉरीशसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉरीशसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण
मॉरीशसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

मॉरीशसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, (भोर) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मॉरिशसच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या आवारात बसविण्यात येणार आहे. हा पुतळा पुण्यातील शिल्पकाराने साकारला असून ही राज्यासह पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पुतळ्याचे अनावरण २७ सप्टेंबर रोजी मॉरिशस येथे होणार असल्याची माहिती फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रोहिदास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी डॉ. जाधव म्हणाले, ‘‘या पूर्वी २०१९ मध्ये मॉरिशसमध्ये पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे विलंब आला.आता पुतळ्याचे काम पूर्ण होत असून पुढील महिन्यात डॉ. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा मॉरिशसमध्ये पाठविण्‍यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण मॉरिशसचे राष्ट्र अध्यक्ष पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या हस्ते केले जाणार येणार आहे. या कार्यक्रमास प्रा. डॉ. प्रकाश कुंभार, साहित्यिक डॉ. शरद गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत.’’

या प्रसंगी मंडळाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. वृषाली रणधीर, डॉ. मेघना भोसले, उपाध्यक्ष सुनित गजरमल, आनंदा जाधव, नीलेश घोडेस्वार, डॉ. जयवंत अहिवळे आदी उपस्थित होते.

वाघोली येथील सुभाष अल्हाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तांब्याच्या धातूपासून पुतळा तयार केला आहे. तो साधारणपणे अडीच ते तीन फूट आकाराचा आहे. पुण्यातून त्याची रचना करण्यात आल्यामुळे याला एक विशेष महत्त्व आहे.
- डॉ. वृषाली रणधीर, अध्यक्षा, पुणे शाखा, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d90506 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..