नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे
नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे

नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः ‘‘लहान मुलांसाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा नाट्यछटा सारख्या स्पर्धा सातत्याने होणे गरजेचे आहे. एवढ्या संख्येने मुलं या स्पर्धेत सहभागी झाली. त्या बद्दल मी मुलांचे, पालकांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करतो. अविनाश देशमुख माझ्या मोठ्या भावासारखे होते, त्यांच्या नावाने ही स्पर्धा घेतल्याबद्दल आभार मानतो, असे ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते मोहन जोशी म्हणाले.
बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पुणे जिल्ह्यातून १३० व पुणे शहरामधून ६९ विद्यार्थी सहभागी झाले होते. तर प्राथमिक फेरीसाठी जिल्ह्यातून ग्रामीण आणि शहरातील १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, हवेली, पुरंदर, भोर, तळेगाव दाभाडे, उरुळी कांचन, लोणीकंद या केंद्रामधून अंतिम फेरीसाठी १३० विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्यान मंगल कार्यालयात रविवारी (ता. १४) अंतिम फेरीतील विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अभिनेत्री ऋतुजा देशमुख, ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी, बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष उदय लागू, शहर उपाध्यक्ष माधवी सहस्रबुद्धे, ग्रामीण उपाध्यक्ष दीपाली शेळके, कोषाध्यक्ष अरुण पटवर्धन, मुख्य कार्यवाह दीपक रेगे, निळू फुले अकादमीचे विश्वस्त सुरेश देशमुख, कार्यकारिणी सदस्य जतिन पांडे, देवेंद्र भिडे, बाल रंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परीक्षक म्हणून मिलिंद दास्ताने, ज्ञानेश वाडेकर, दिलीप हल्याळ, संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, राजश्री राजवाडे-काळे, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, अतुल कासवा, देवेंद्र भिडे, सायली संभारे यांनी काम पाहिले. अंतिम फेरीदरम्यान सर्व परीक्षक उपस्थित होते. अभिनव विद्यालय, सरदवाडी (ता. शिरूर), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीकंद (ता. हवेली), महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन (ता. हवेली), न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव), केंद्र शिशू विकास मंदिर (ता. दौंड) या पाच केंद्रांत स्पर्धा झाली.


पुणे जिल्ह्यातील विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे
अभिनव विद्यालय, सरदवाडी (ता. शिरूर), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी, व्हीजन इंटरनॅशनल स्कूल, शिरूर, विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई (ता. शिरूर), जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण, आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर.

विजेते विद्यार्थी
श्रीमई सुजित बनकर, रुत्वा आशिष जावळे, नक्षत्रा निशाद पटवर्धन, अनुष्का संजय तंटक, अलोक शेलार, शौर्य उल्हास वाळसे,
सोहम श्रीकृष्ण गावंडे, राधिका अतुल बोबडे, प्राची सचिन बाहेकर, अथर्व जितेंद्र पाटील, गायत्री गोकूळ खेडकर, सुरभी शरद जाधवर, आरशिया सहाबीर शेख, रिया मोरडे, रुद्र श्रीमंडलकर, एक्षाली जोशी, समृद्धी संदीप कोतमिरे, ईश्वरी नवनाथ बोकले, मायरा कर्नावट, पार्थ पवार, अथश्री फुलफगर, अपेक्षा नानाभाऊ शेळके, सुहानी क्षिरसागर.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d90934 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..