संस्था, संघटनांनी फोडली दहीहंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्था, संघटनांनी फोडली दहीहंडी
संस्था, संघटनांनी फोडली दहीहंडी

संस्था, संघटनांनी फोडली दहीहंडी

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. कोविड-१९ मुळे गेली दोन वर्ष दहीहंडीचा साजरी करण्यात आली नव्हती. मात्र यंदा अनेक मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी अनोख्या पद्धतीने दहीहंडी फोडली.

पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम : पुणे विचारपीठ आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्यावतीने यंदाही भगवान श्री कृष्ण विचारांचा रुग्णसेवेचा दहीहंडी उत्सव ससून हॉस्पिटलमध्ये आज साजरा झाला. यावेळी एक हजार ४०० सुगंधी दुधाच्या पिशव्यांची दहीहंडी उभारून ससून हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक वॉर्डमधील रुग्णांच्या हस्तेच प्रतीकात्मकरीत्या दहीहंडी फोडण्यात आली. ऑर्थोपेडिक विभागातील रुग्ण सागर अहिरे आणि नीलेश बोराडे यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर वॉर्डमधील रुग्णांना दुधाचे वाटप करण्यात आले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, शिवानी माळवदकर, कात्रज डेअरीचे उपसंचालक राहुल दिवेकर, कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक संजय कालेकर, विपणन व्यवस्थापक पांडुरंग कोंढाळकर, वितरण व्यवस्थापक सोमनाथ मेंगडे यावेळी उपस्थित होते.

अपंग कल्याणकारी संस्थेच्या मुलांनी फोडली दहीहंडी :
दिव्यांग असूनही थरावर थर रचत वानवडी येथील अपंग कल्याणकारी संस्थेच्या बाळगोपाळांनी कसबा पेठेतील दहीहंडी मोठ्या उत्साहात फोडली. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै. सौ. प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ आपली दहीहंडी आणि माता यशोदा सन्मान सोहळ्याचे आयोजन माणिक चौकाजवळील अमेय सोसायटीच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी विशेष मुलांचे संगोपन करणाऱ्या संतुलन पाषाण शाळेतील मावशी ॲलीस जोसेफ मसीह यांना स्व.सौ.प्राची प्रकाश काळे स्मरणार्थ ‘माता यशोदा सन्मान’ प्रदान करण्यात आला. प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे उपस्थित होते.
85557

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d91603 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..