वरवंडच्या सरपंचपदी मीनाक्षी दिवेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवंडच्या सरपंचपदी मीनाक्षी दिवेकर
वरवंडच्या सरपंचपदी मीनाक्षी दिवेकर

वरवंडच्या सरपंचपदी मीनाक्षी दिवेकर

sakal_logo
By

वरवंड, ता. १९ : वरवंड (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीनाक्षी दिवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक सुभाष डोळस यांनी दिली. मीना दिवेकर यांनी नियोजित कार्यकाळानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदासाठी सभागृहात सरपंच निवड प्रक्रिया घेण्यात आली. या वेळी सरपंचपदासाठी मीनाक्षी दिवेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मीना दिवेकर यांच्या हस्ते मीनाक्षी दिवेकर यांचा सन्मान करून त्यांना खुर्चीवर बसविण्यात आले. या वेळी जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर, निवडणूक अधिकारी मंडल अधिकारी नितीन मक्तेदार, उपसरपंच बाळासाहेब जगताप, प्रदीप दिवेकर, तानाजी दिवेकर, अशोक फरगडे, पोलिस पाटील किशोर दिवेकर, विलास दिवेकर, मनोज सातपुते, दशरथ दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

८५५९५

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d91666 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..