देऊळगावगाडा येथे वडाच्या फांद्यांची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देऊळगावगाडा येथे वडाच्या फांद्यांची लागवड
देऊळगावगाडा येथे वडाच्या फांद्यांची लागवड

देऊळगावगाडा येथे वडाच्या फांद्यांची लागवड

sakal_logo
By

वरवंड, ता. ४ : पुणे येथील एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व वरवंड वनपरिमंडल यांच्या वतीने देऊळगावगाडा (ता.दौंड) वनक्षेत्रात वडाच्या फांद्यांच्या (स्टंप) लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. रस्ता रुंदीकरणात वडाची झाडे तोडावी लागली होती. त्या झांडाची वनक्षेत्रात केलेली स्टंप लागवड यशस्वी झाली. त्यामुळे फांदी लागवडीचा उपक्रम राबविण्यावर भर दिला असल्याचे वनपरिमंडल अधिकारी शीतल खेंडके यांनी सांगितले.
दौंड तालुक्यात वनविभागाच्या वतीने हिंगणीगाडा, रोटी, देऊळगावगाडा आदी वनक्षेत्रात वडाच्या झांडाच्या योग्य आकार व उंचीच्या फांद्या ) लावण्यात आल्या होत्या. तसेच वनविभागाच्या नियोजनाने वरवंड येथील फार्मसी कॉलेजच्या वतीने देखील देऊळगावगाडा वनक्षेत्रात मध्यंतरी लावण्याचा उपक्रम केला. होता. मात्र, संबंधित लागवड केलेल्या फांद्यांना प्रचंड प्रमाणात पानांची फुटवण झाली. हे पाहून पुणे येथील एआयएसएसएमएस फार्मसी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्टंप लागवडीचा उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार वरवंड परिमंडल विभागाने देऊळगावगाडा वनक्षेत्रात खड्डे व वडाच्या फांद्यांचे नियोजन केले.
एआयएसएसएमएस फार्मसी कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थांनी व वनविभाग यांच्या वतीने स्टंप लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थांनी पथ नाट्याव्दारे वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले.तसेच वृक्ष लागवडीचे घोष वाक्य असणारे आदी फलक लावले. पक्ष्यांसाठी झाडांना धान्यभरुन फिडर लावले.

याप्रसंगी वनपरिमंडल अधिकारी खेंडे, एआयएसएसएमएस कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी माडगुळकर, प्राचार्य अमिता डोंगरे,वनरक्षक शीतल मेरगळ, डॉ. राहुल पाडळकर, डॉ. मंगेश भालेकर, दत्तात्रेय टेकवडे, संध्या निकम, प्रज्ञा मगदूम, प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते.

89087

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d96988 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..