करडे येथील खड्डा ठरतोय धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करडे येथील खड्डा ठरतोय धोकादायक
करडे येथील खड्डा ठरतोय धोकादायक

करडे येथील खड्डा ठरतोय धोकादायक

sakal_logo
By

गुनाट, ता. ५ ः शिरूर- सातारा महामार्गावरील करडे (ता. शिरूर) घाट माथ्यावर असलेला व पाईपलाईनसाठी खोदलेला खड्डा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. मागील चार दिवसांत येथे पाच वाहनांचा अपघात झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा खड्डा बुजवावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, परिसरातील शेतकऱ्याने पाइपलाइन टाकण्यासाठी हा महामार्ग खोदला आहे. मात्र, त्यानंतर तो व्यवस्थित बुजवला नाही. याच ठिकाणी सध्या औद्योगिक वसाहतीचे काम सुरु आहे. येथे सातत्याने येणाऱ्या जड वाहतुकीच्या गाड्यांमुळे तर हा खड्डा तर अधिक उखडला आहे. परिणामी वेगात येणाऱ्या वाहनांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे सातत्याने अपघातांची मालिकाच सुरु आहे. याच खड्ड्यामुळे तीन दिवसांपूर्वी एका शिक्षक कुटुंबाला मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले.

शिरूर ते करडे दरम्यान महामार्गाची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था व त्यामुळे होणारे अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाला का दिसत नाही? प्रशासनाने नाही तर, किमान औद्योगिक वसाहतीने तरी आपले सामाजिक दायित्व म्हणून जरी हे खड्डे बुजवण्याला प्राधान्य दिले तरी हा प्रश्न एका दिवसांत मार्गी लागेल.
-अमोल घायतडक, सामाजिक कार्यकर्ते, करडे

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22d97139 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..