बुरशीजन्य रोगांमुळे पिके धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुरशीजन्य रोगांमुळे पिके धोक्यात
बुरशीजन्य रोगांमुळे पिके धोक्यात

बुरशीजन्य रोगांमुळे पिके धोक्यात

sakal_logo
By

गुनाट, ता. ४ : सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा फटका खरीप हंगामातील कांदा पिकाला बसला आहे. सद्यपरिस्थितीत कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे करपा, पीळ पडणे, मुळ्या सडणे, रोपांची मर होणे अशा प्रादुर्भावामुळे गुनाट, निमोणे, परिसरातील शेतकऱ्यांनी मागील तीन महिन्यांत जिवापाड जपलेले कांदा पीक अंतिम घटका मोजत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

जुलै-ऑगस्ट महिन्यात खरीप हंगामातील कांदा पिकाची शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्यासाठी खते, औषधे यांचेही नियोजन केले. या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने हे पीक बहारदार आले होते. मात्र, सातत्याने वातावरणात होणारे बदल, ढगाळ हवामान व पाऊस, यामुळे बुरशीजन्य रोगराईला आयतेच आमंत्रण मिळाले आणि कांदा पीक धोक्यात आले.

रोपवाटिकाही रोगराईला बळी
हवामानातील बदलाचा महिनाभरापूर्वी रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रोपवाटिकांना बसला आहे. रोपवाटिकाही रोगराईला बळी पडल्याने आगामी रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजन कोलमडणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा नवीन रोपवाटिका तयार कराव्या लागणार आहे.


कार्बेन्डाझिम ५०० ग्राम घेऊन दोनशे लिटर पाण्यात मिक्स करून हे द्रावण पाण्यातून पिकास सोडावे. कार्बेन्डाझिम सह मेन्कोझेब २० ग्राम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व त्यांनतर पाच दिवसांनी ट्रायकोडर्मा दोन लिटर व सुडोमोनास दोन लिटर २०० लिटर पाण्यात मिसळून पाण्यातून सोडावे. जेणेकरून कांदा पिकावर झालेला प्रादुर्भाव चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईल.
- जयवंत भगत, कृषी सहायक

96947