वाल्ह्यात नववधूची बैलगाडीतून मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यात नववधूची बैलगाडीतून मिरवणूक
वाल्ह्यात नववधूची बैलगाडीतून मिरवणूक

वाल्ह्यात नववधूची बैलगाडीतून मिरवणूक

sakal_logo
By

वाल्हे, ता. ४ : पूर्वी पारंपारिक पद्धतीने विवाहसोहळे होत असत. हळूहळू त्याला आधुनिकतेचा टच मिळत गेला आणि पूर्ण विवाहसोहळेच कधी आधुनिक होऊन गेले ते कळलेच नाही. मात्र, आता या सोहळ्यांना जुन्या परंपरेचा टच देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. वाल्हे (ता. पुरंदर) वरचामळा येथील नववधू ऋतिका भुजबळ चक्क बैलगाडीतून मिरवणुकीने सासरी जायला निघाली. तिच्या या बैलगाडीतील मिरवणुकीने अनेकांना वीस-तीस वर्षापूर्वी साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक लग्नसोहळ्याची आठवण झाली.
वरचामळा येथील महावीर भुजबळ व स्वाती भुजबळ यांची कन्या ऋतिका भुजबळ हिचा विवाह लोणंद येथे राजकुमार क्षीरसागर व सुनीता क्षीरसागर यांचा मुलगा प्रतीक क्षीरसागर यांच्याशी पारंपारिक पद्धतीने पार पडला. ऋतिकाच्या वडिलांनी आपल्या कन्येच्या मिरवणुकीसाठी डिजे न आणता पाठीवर गुलाल उधळलेल्या आणि घुंगूरमाळ घातलेल्या सर्जा-राजाच्या बैलगाडीतून तिची गावांतर्गत मिरवणूक काढली होती. या विवाहसोहळ्यात वधू-वराच्या मातापित्यांनी या सोहळ्याला वेगळे बनविताना वऱ्हाडी मंडळींना पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते आंब्याचे रोप भेट देऊन निसर्ग वाचवा आणि त्याद्वारे उत्पन्नही मिळवा असा संदेश दिला. या प्रसंगी मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, सचिन लंबाते, विराज काकडे, राजेश काकडे, हेमंतकुमार माहूरकर, राजेंद्र बरकडे, सिद्राम भुजबळ, पोलिस निरीक्षक मारुती नेवसे, पत्रकार सुनील लोणकर, रमेश लेंडे आदि उपस्थित होते.

68381

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22f01965 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top