पेठ गावाच्या विकासासाठी एकजुटीने योगदान द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठ गावाच्या विकासासाठी 
एकजुटीने योगदान द्यावे
पेठ गावाच्या विकासासाठी एकजुटीने योगदान द्यावे

पेठ गावाच्या विकासासाठी एकजुटीने योगदान द्यावे

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. २ : ‘‘पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल. या ठिकाणाहून लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक व सचोटीने काम करावे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान दिले, तरच यापुढेही या गावात विकासकामे जोरात सुरु राहतील,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पेठ येथील ग्रामपंचायत नूतनीकरण व विविध विकासकामांचे उद्‍घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, प्रवक्ते विकास लवांडे, सरपंच सूरज चौधरी, माजी संचालक रघुनाथ चौधरी, उपसरपंच जयश्री चौधरी, पोलिस पाटील दत्तात्रेय चौधरी, माजी सरपंच महादेव चौधरी, सोमनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर आदी उपस्थित होते. सरपंच सूरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22f02055 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top