वाल्हे परिसरात उभारली शिवस्वराज्य गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हे परिसरात उभारली 
शिवस्वराज्य गुढी
वाल्हे परिसरात उभारली शिवस्वराज्य गुढी

वाल्हे परिसरात उभारली शिवस्वराज्य गुढी

sakal_logo
By

वाल्हे, ता. ६ : पुरंदर तालुक्यातील वाल्ह्यासह आडाचीवाडी, वागदरवाडी, सुकलवाडी, दौंडज, पिंगोरी आदी ग्रामपंचायतींमध्ये शिवस्वराज्य गुढी उभारण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांनी सांगितले.
आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होत्या. याप्रसंगी तंटामुक्तीचे समितीचे अध्यक्ष विनय पवार, उद्योजक अथर्व पवार, मंदाकिनी पवार, मोनाली पवार, जयवंत पवार, नामदेव पवार, गणपत खुटवड, आविष्कार पवार आदि उपस्थित होते. ग्रामसेवक अनिल हिरास्कर यांनी आभार मानले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते गुढी उभारून पूजन करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच महादेव चव्हाण, त्रिंबक भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, किरण कुमठेकर, चंद्रशेखर दुर्गाडे, इक्बाल आतार, मारुती पवार, सागर पवार उपस्थित होते.
69194

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22f03231 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top