‘त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा’
‘त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा’

‘त्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा’

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून तिची चौकशी व्हावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी पैशांची देवाण-घेवाण केल्याचे ऑडिओमधून स्पष्ट होते. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशांचे आमिष दाखवून आरक्षणासंदर्भांत निघालेल्या मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकांबरोबर आर्थिक व्यवहार झाल्याचे कळते. त्यामुळे त्या ऑडिओची तत्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे, असे काळे यांनी नमूद केले आहे.