शाहू वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस
शाहू वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस

शाहू वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : शाहूनगर, चिंचवड येथील शाहू सार्वजनिक वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या चरित्राची पुस्तके भेट देण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षक विलास जेऊरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्याख्याते राजेंद्र घावटे म्हणाले, ‘‘वाचन हा एक संस्कार आहे. तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतो.’’ जेऊरकर म्हणाले, ‘‘वाचनामुळे माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. वाचन नसेल तर जीवन अपूर्ण आहे.’’

यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपाग, ज्येष्ठ नागरिक संघाचे रामदास जाधव, राजगोंडा पाटील, राजाराम रायकर, गोपाळ सैंधाणे, मनीषा पाटील, कैलास तापकीर उपस्थित होते. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल यांनी प्रास्ताविक केले. राजाराम वंजारी यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पगारे यांनी आभार मानले. ग्रंथपाल अनीता पाटील, मनीषा आनंदास, भरत गायकवाड, दयानंद कांबळे, नरेंद्र जयसिंगपूरे यांनी संयोजन केले.