बाजारपेठ भरले लाल मातीच्या पणत्यांनी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारपेठ भरले लाल मातीच्या पणत्यांनी!
बाजारपेठ भरले लाल मातीच्या पणत्यांनी!

बाजारपेठ भरले लाल मातीच्या पणत्यांनी!

sakal_logo
By

पिंपरी, ता.१८ ः दिवाळी हा प्रामुख्याने प्रकाशाचा सण असल्यामुळे पणती खास महत्त्वाची आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पारंपरिक पणत्यांसोबतच विविध आकार व प्रकार उपलब्ध आहेत. चौका-चौकामध्ये सध्या पारंपारिक सोबतच विविध आकार व प्रकारच्या पणत्या असलेले स्टॉल उभारले असून खरेदी चांगला प्रतिसाद आहे.

दिवाळी हा प्रामुख्याने दिव्यांचा सण. दिवाळीमध्ये देवघरापासून अंगणापर्यंत सर्व परिसरात पणत्या लावण्याची प्रथा आहे. घर दिव्यांनी उजळून निघते. सणाच्या निमित्ताने पणत्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. आकुर्डी, निगडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, एम्पायर इस्टेट, एच. ए. कॉर्नर, शगुन चौक, भोसरी, सांगवी अशा मार्गांवर पणत्यांची स्टॉल लागले आहेत. याठिकाणी पारंपारिक पणतीशिवाय काचेपासून बनवलेल्या, चिनी मातीपासून तयार केलेल्या, फुलांच्या, प्राण्यांच्या आकारातील, रंगबेरंगी अशा विविध आकारातील व प्रकारात उपलब्ध आहेत. अगदी दोन रुपये ते साठ रुपये नगापर्यंत किंमत आहे. लालमातीच्या साध्या लहान आकारातील एक पणती दोन रुपये, रंगीबेरंगी मातीतील एक पणती १० रुपये तर चकमकी, काच, मणी आदींपासून सजविण्यात आलेल्या पणत्यांची किंमत ३० रुपये ते १०० रुपयांपासून सुरू आहे.

लाखो पणत्या दाखल
गुजरात, पश्‍चिम बंगाल आदी राज्यांतून ५० लाखांपेक्षा अधिक लाल मातीत घडवलेल्या पणत्या बाजारपेठेत आल्याची माहिती पंकज कुमार या बिहारी व्यापाऱ्याने दिली. याशिवाय इतरही राज्यांतून पणत्या उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात हातगाड्यांवर पणती विक्री करण्यासाठी बिहारमधून ७० पेक्षा अधिक तरुण आले आहेत.

काळ्या मातीच्या जागी लाल मातीच्या पणत्या
पूर्वी मोठ्या कष्टाने कुंभाराकडून घडवलेल्या काळ्या मातीच्या पणतीला ग्राहकांकडून मागणी होती. मात्र, आता काळ्या मातीच्या तुलनेत लाल मातीत कमी कष्टात व कमी खर्चात तयार होणाऱ्या पणत्यांची मागणी वाढली. त्यामुळे कुंभार कर्नाटक, गुजरात, राजस्थान, कोलकता येथून पणत्यांची होलसेल भावात खरेदी करून स्वत: बनवलेले बो‌ळके, गवळण, घोडा, वाघ व लक्ष्मी आदींसोबत विक्री करत आहेत.

चायना पणती दाखल, मात्र प्रमाण कमी
प्लास्टिक तसेच लायटिंग असणाऱ्या चायना पणत्या बाजारात उपलब्ध आहेत, परंतु दिवसेंदिवस बाजारपेठेतून चायना वस्तूंचे प्रमाण कमी होत असल्याची माहिती अनिल राठी यांनी दिली.


पणत्याचे प्रकार - यावर्षीचे दर - गेल्या वर्षीचे दर -
माती - ३० ते ७० रुपये डझन - २० ते ५० रुपये डझन.
कुंदन - एक जोडी ५० ते २०० -४० ते १८०
दीप माळ - ७० ते ३०० - ६० ते २७०
चिनी माती - १५ ते ३० - १० ते २६
कप मेणबत्ती - ७० ते १५० (रुपये डझन) - ७० ते १३०(रुपये डझन)
कासव - ३० ते ४० - २५ ते ४०
मासा - ३५ ते ४० - ३०ते ४०
तुळस - १५ ते ४० - १५ ते ३०
-