चला गावाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चला गावाला...
चला गावाला...

चला गावाला...

sakal_logo
By

पिंपरी ः दिवाळीच्या सुट्या लागल्याने शनिवारी बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांची वल्लभनगर एसटी आगारात पहाटेपासूनच तोबा गर्दी झाली होती. गावाला जाऊन सण मोठ्या आनंदात व उत्साही वातावरणात नातेवाइकांबरोबर साजरा करता येणार, याचा आनंद चेहऱ्यावर साफ झळकत होता. सकाळी बोचरी थंडी पडल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे लहान मुलांना कानटोपी, स्वेटर घालूनच आगारात येत होते. आगारात प्रमाणापेक्षा जास्त गाड्या आल्याने काही गाड्या या बाहेरूनच मार्गस्थ होत होत्या, तर काही प्रवाशांनी गाडीच्या चौकशीसाठी गर्दी केली होती. मागच्या वर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत नोव्हेंबरमध्ये संप पुकारला होता. त्यावेळेस येथे शुकशुकाट होता. त्याला आता पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. पण, यंदा मात्र उलट चित्र दिसत असून, गर्दीने आगार फुलले आहे. वल्लभनगर एसटी आगारातील ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)