सौभाग्य दालनात करा मनाजोगती खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौभाग्य दालनात करा मनाजोगती खरेदी
सौभाग्य दालनात करा मनाजोगती खरेदी

सौभाग्य दालनात करा मनाजोगती खरेदी

sakal_logo
By

बारामती येथील इंदापूर रस्त्यावरील सौभाग्य दालन आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झाले असून, येथे ग्राहकांच्या कपडेखरेदी मनाजोगती होणार असल्याने ग्राहकांना इच्छापूर्तीचे समाधान लाभणार आहे. एकाच छताखाली खरेदीमुळे ग्राहकाचा वेळ व पैसा वाचणार आहे.
होलसेल साडी डेपोपासून या दालनाचा प्रारंभ झाला. मात्र ग्राहकांनी जो प्रतिसाद दिला, विश्वास दाखविला, त्यामुळे आता फक्त साड्यांपुरतेच हे दालन मर्यादित न राहता कुटुंबातील सर्वांसाठी येथे सर्व काही उपलब्ध झाले आहे. महिलांसाठी साडी स्पेशल विभागामध्ये कांजीवरम, मदुराई, पैठणी, काठपदर, शालू, बनारसी शालू, धर्मावरम, नववार, बेंगलोर सिल्क, कॅटलॉग साड्या, डिझायनर साड्या, मानपानाच्या साड्या, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जेगिन्स, प्लाझो, कुर्ता पायजामा, जीन्स, टी शर्ट, टॉप्स, वनपीस, घागरा चोली, वेस्टर्न वेअर, लेडीज होजिअरी असे प्रकार आहेत. पुरुषांसाठी शेरवानी, ब्लेझर, जोधपुरी, फॅशनेबल कुर्ते, जॅकेट, टी शर्ट, जीन्स, शर्ट ट्राऊझर्स, शूटिंग, शटिंग, पार्टी वेअर, कॅज्युअल्स, फॉर्मल, जेन्टस होजिअरी उपलब्ध आहेत.
लहान मुलांसाठी जीन्स, टी-शर्टपासून ते वेस्टर्न पार्टी वेअर, टॉप, फ्रॉक अशी व्हरायटी आहे. या शिवाय टॉवेल टोपीपासून ब्लॅकेट बेडशीटपर्यंत अनेक नानाविध प्रकारची वस्त्रखरेदी सौभाग्य होलसेल साडी डेपो मध्ये करता येते. त्याचबरोबर ग्राहकांसाठी दिवाळीची स्पेशल ऑफर देण्यात येणार आहे.
''सौभाग्य'' होलसेल साडी डेपो मध्ये खरेदी केल्यानंतर प्रत्येक खरेदीवर डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. संपूर्ण कुटुंबाची मनपसंत खरेदी ''सौभाग्य'' होलसेल साडी डेपो मध्ये करता येईल. पार्किंगची प्रशस्त सोय, गुणवत्ता, दर्जा व माफक दर यांमुळे ग्राहकांची मने जिंकत सौभाग्य होलसेल साडी डेपोने बारामती बरोबरच लक्ष्मी नगर, फलटण येथे दुसरी शाखा सुरू केली आहे.