सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व
सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व

सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व

sakal_logo
By

राजकारणातील अनेक जणांशी अत्यंत सौहार्दपूर्ण असे संबंध असणारे आणि सुसंस्कृत व अभ्यासू अशी ओळख आपल्या कार्यातून निर्माण करणारे नेतृत्व म्हणजे आदरणीय दिलीपराव दत्तात्रेय वळसे पाटील.

- मानसिंग पाचुंदकर पाटील, अध्यक्ष, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेस

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील दिलीपराव दत्तात्रेय वळसे पाटील या सुपुत्राने आपल्या कार्याने राजकारणात समाजकारणात अमीट अशी छाप सोडली आहे. देशाचे नेते व शेतकऱ्यांचे कैवारी शरदचंद्रजी पवारसाहेब व दिवंगत आमदार दत्तात्रेय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वळसे पाटीलसाहेबांची कारकीर्द घडत गेली. घरातूनच त्यांना समाजकारण व राजकारणाचा संपन्न असा वारसा मिळाला. वडील दत्तात्रेय वळसे पाटील यांनी आमदारकीच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचप्रमाणे दिलीपराव यांनी आपल्या विकासकामाच्या झंजावातातून आंबेगावचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले.
वळसे पाटीलसाहेबांनी पवारसाहेबांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहिले आणि या काळात साहेबांच्या सहवासातून व मार्गदर्शनातून त्यांचे अभ्यासू आणि प्रगल्भ असे नेतृत्व घडत गेले. त्यांच्यातील क्षमता व विविध गुणांना योग्य असे पैलू पवारसाहेबांनी पाडले. त्यातूनच आजचे हे अभ्यासू असे नेतृत्व निर्माण झाले. सार्वजनिक व राजकीय जीवनात काम करत असताना वैयक्तिक कोणावर टीका टिपण्णी न करता कामाच्या माध्यमातून उत्तरे देण्याचा त्यांचा गुण सर्वांना भावतो. साहेबांचा अभ्यासूपणा व हुशारी पवारसाहेबांनी हेरली व त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या. पवारसाहेबांनी सोपविलेल्या या जबाबदाऱ्या उत्तमपणे पेलून त्यांनी पवारसाहेबांचा विश्वास सार्थ ठरविला.
जेव्हा जेव्हा संकटे व अडचणीचे प्रसंग निर्माण झाले, त्या त्यावेळी साहेब संकटमोचकाच्या रूपाने धावून आले. विषय कोणताही असो, त्यावर मत व्यक्त करताना अत्यंत अभ्यासूपणे व संयतपणे ते व्यक्त होतात. अवघड विषयांची मांडणी कशी करावी, अवघड विषय कसे मांडावेत, हे वळसे पाटीलसाहेबांकडून शिकण्यासारखे आहे.
राज्यात ज्या वेळेस वीजटंचाईचा प्रश्न गाजत होता, त्यावेळेस साहेबांनी वीजखात्याचा अर्थात उर्जामंत्रीपदाचा कारभार स्वीकारत विजेच्या भारनियमनाचा प्रश्न मार्गी लावत भारनियमनातून जनतेची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. अवघड परिस्थितीला न डगमगता त्या अवघड परिस्थितीशी सामना करून परिस्थितीत बदल घडवून आणण्याची ताकद वळसे पाटीसाहेबांच्या नेतृत्वात आहे.
शिक्षण हे परिवर्तनाचे, बदलाचे साधन आहे, या जाणिवेतून साहेबांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम करताना विविध प्रकारची शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी छाप सोडली. त्याच बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कौशल्याचे शिक्षण मिळाले पाहिजे, याकरिता विशेष प्रयत्न केले. विशेषतः अवसरी येथे उभे राहिलेले शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज... यातून साहेबांची असणारी दूरदृष्टी त्याच बरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी असलेले प्रेम बांधिलकी याची प्रचिती येते. हजारो विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून उद्योग व्यवसायात कार्यरत झाले आहेत.
आपल्या राजकारणात साहेबांनी सातत्याने सामान्य माणूस, शेतकरी, महिला, युवक व विकासापासून वंचित असणाऱ्या वंचित घटकांना केंद्रीभूत मानून आपले कार्य केले. सत्तेच्या माध्यमातून सामान्याच्या जीवनात सुखाची हिरवळ फुलावी यासाठी वळसे पाटीलसाहेब हे सत्ता असो अथवा नसो सतत कार्यरत असतात. खरच कामाची ही ऊर्जा त्यांच्यातील सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहे.

भीमाशंकर कारखान्याची घोडदौड
पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊस शेती वाढली, अशावेळी शेतकऱ्यांसाठी हक्काचा साखर कारखाना असावा, या भावनेतून त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली अन् पारगाव येथे साखर कारखाना उभा केला. आज या कारखान्याच्या माध्यमातून लाखो टन उसाचे गाळप होत असून, कारखान्यावर
साहेबांचे असलेल्या वैयक्तिक लक्षामुळे अल्पावधीतच साखर कारखान्याने भरीव अशी प्रगती केली असून, शेतकऱ्यांची कामधेनू असणाऱ्या या साखर कारखान्याला देशपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वळसे पाटीलसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची सुरू असलेली घोडदौड भविष्यात अधिक वेगाने होईल, असा विश्वास सर्वाना आहे.

‘जिथे कमी तिथे वळसे’
अभ्यासू वृत्ती, राजकारण, अर्थकारण व समाजकारण याची असणारी जाण यातूनच ज्या वळसे पाटीलसाहेबांकडे राज्याच्या अर्थमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून ही त्यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पाडली. राज्यातील विविध विकासात्मक कामांना अर्थमंत्रिपदाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला. साहेबांना संसदीय कार्य परंपरांचा गाढा अभ्यास व प्रदीर्घ, अशी साहेबांची राजकीय कारकीर्द या अनुभवाच्या आधारे साहेबांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वी व यादगार केली. विधानसभा अध्यक्षपदी असताना सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही समान न्याय देण्याची भूमिका पार पाडली. सर्व पक्षीयांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. संसदीय परंपरा व प्रथा यांचे सखोल ज्ञान साहेबांना आहे. मंत्रिमंडळात गृहखाते हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गृहमंत्री पदाची अवघड अशी जबाबदारी साहेबांनी लिलया पेलली. गृहमंत्रिपदी कार्यरत असताना राज्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही यशस्वीरीत्या पार पाडली. ‘जिथे कमी तिथे वळसे’ अशी साहेबांची खासियत असून, आजपर्यंत मंत्रिमंडळात त्यांनी गृहखाते, ऊर्जा, उच्चशिक्षण, कामगार, उत्पादन शुल्क विधानसभेचे सभापती अशा जबाबदाऱ्या स्वीकारल्या. अनेकदा साहेबांची मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी चर्चा होत असते. साहेबांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द व अभ्यासू वृत्ती, संयम, चिकाटी व सतत कार्यरत राहणे व सामान्यांच्या जीवनात सुखाचे दिवस आणण्यासाठीच्या धडपडीमुळे एकना एक दिवस साहेब मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास आम्हा सर्वांनाच वाटतो.

न थकता अविश्रांतपणे कार्यरत
शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची सन २०१४ ला पुनर्रचना झाली व त्यामुळे शिरूर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली. ही गावे विधानसभा मतदारसंघाला जोडली गेल्यानंतर वळसे पाटीलसाहेबांनी या भागात ही विकासकामाचा झंझावात निर्माण केला. सिंचनाच्या प्रश्नासह रस्ते व अन्य विकासकामांचा धडाका त्यांनी लावला मंत्रिपदी असूनही आजही मतदारसंघातील विविध गावातील लोकांशी कार्यकर्त्यांशी साहेबांचा थेट संबंध व संवाद आहे. साहेब अनेकदा कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खाच्या प्रसंगी धावून जात असतात. माळीण येथे झालेल्या दुर्घटनेनंतर साहेब तातडीने त्याठिकाणी धावून गेले व गावकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला. मागील दहा दिवसांपासून मतदारसंघात विविध गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यावेळीही साहेबांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करीत शासकीय पातळीवरून मदतीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे.
साहेब सातत्याने सामान्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत आहेत व न थकता अविश्रांतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यात त्याच्या पत्नी किरणताई, मुलगी पूर्वा व विवेक आणि प्रदीप हे पुतणेही मोठी साथ देत असतात.

येवो कोणताही काळ,
तरी असता सयंमी तुम्ही
सदा सकारात्मक दृष्टी
अन् अभ्यासूपर्ण कार्यरत तुम्ही
सत्ता असो अथवा नसो
रमता जन सामान्यात तुम्ही
बांधिलकी जनसामन्यांशी तुमची
जनजनांच्या घरात व मनात प्रतिमा तुमची