पतीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून लोहगावात विवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून 
लोहगावात विवाहितेची आत्महत्या
पतीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून लोहगावात विवाहितेची आत्महत्या

पतीच्या प्रेमप्रकरणाला कंटाळून लोहगावात विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : पतीचे दुसऱ्या एका महिलेशी असलेले संबंध आणि त्यातून होणाऱ्या भांडणाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लोहगाव भागात रविवारी (ता. ३०) हा प्रकार घडला. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
सारिका विकास शेळके (वय. २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती विकास दामू शेळके (वय ३०, रा. पठारे वस्ती, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सारिका यांचे वडील श्यामराव पाटील (वय. ५५, रा. कोल्हापूर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका आणि विकास यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. विवाहानंतर विकासचे एका महिलेशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती सारिकाला मिळाली. सारिकाने याबाबतची माहिती वडिलांनी दिली. महिलेशी असलेले प्रेमसंबंध तोडून टाकण्याबद्दल विकासला नातेवाइकांनी समजावून सांगितले. मात्र, त्यानंतरही त्याचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने दिलेल्या त्रासामुळे सारिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस उपनिरीक्षक ए. एस. लहाने पुढील तपास करीत आहेत.