कात्रज भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज भागात महिलेचे 
मंगळसूत्र हिसकावले
कात्रज भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कात्रज भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : कात्रज परिसरात पादचारी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. कात्रजमधील सुखसागर परिसरात असलेल्या शशिबन बंगल्यासमोर रविवारी (ता. ३०) ही घटना घडली. याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सुखसागरनगर परिसरातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार बरडे तपास करत आहेत.