...म्हणून आयटीयन्स-स्थानिकांमध्ये खटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...म्हणून आयटीयन्स-स्थानिकांमध्ये खटके
...म्हणून आयटीयन्स-स्थानिकांमध्ये खटके

...म्हणून आयटीयन्स-स्थानिकांमध्ये खटके

sakal_logo
By

हिंजवडी, ता. १ : हिंजवडी आयटी नगरीतील युवा वर्गाचे पाश्चात्त्य संस्कृतीतील राहणीमान म्हणून मध्यरात्रीनंतरही रंगणाऱ्या पब पार्ट्या, दररोजचा धांगडधिंगा, नेहमी केले जाणारे बेशिस्त पार्किंग...याशिवाय स्थानिकांना कमी लेखण्याची भावना त्यांच्यात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यातूनच आयटीयन्स-स्थानिकांमध्ये वाद, शिवीगाळ आणि किरकोळ हाणामारीच्याही घटना सातत्याने घडत असतात.

नोकरीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण-तरुणींची संख्या लाखात आहे. त्यामुळे हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, बावधन आदी भागात होस्टेलसचे मोठे जाळे तयार झाले आहे. तर फ्लॅट, रूम भाड्याने घेऊन ग्रुपने राहणाऱ्यांची संख्याही हजारोत आहे. सर्व होस्टेल अनेक ठिकाणी नागरी वस्त्यात आहेत. मात्र, याचे भान न राखता सार्वजनिक ठिकाणी बेधुंद वागतात. वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणे, बेशिस्त वाहने चालवून दोन्ही लेनवर कोंडी करणे, सार्वजनिक ठिकाणी तासन-तास एकमेकांच्या गळ्यात हात घालून गप्पा मारणे, खोलीचे भाडे,, खानावळ बिल थकवून पळ काढणे, रूमवर मित्र जमवून पार्ट्या करणे, मध्यरात्री दारू पिऊन आरडाओरडा करणे, नशेत भांडणे करणे...अशा अनेक कारणांमुळे आयटीयन्स आणि स्थानिकांत कायम निखारा आहे.