भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊस खर्चात २२कोटींची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊस खर्चात २२कोटींची वाढ
भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊस खर्चात २२कोटींची वाढ

भामा आसखेडच्या जॅकवेल, पंप हाऊस खर्चात २२कोटींची वाढ

sakal_logo
By

पिंपरी, ता.५ ः भामा आसखेड प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या जॅकवेल व पंप हाऊसच्या खर्चात २२ कोटींनी वाढ होणार आहे. कामाची मूळ अंदाजपत्रकी तरतूद १५० कोटी होती. सुधारित अंदाजपत्रकी रक्कम १७२ कोटी रुपये करण्यास महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली.

या धरणातील १६७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षित आहे. ते पाणी उचलण्यासाठी धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथील१.२० हेक्टर जागेत २०० दशलक्षलिटर (एमएलडी) प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन महापालिका बांधणार आहे. तेथून नवलाख उंब्रे येथील ब्रेक प्रेशर टँक पर्यंत पाणी आण्यात येणार आहे. तेथून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाणार आहे.

महापालिकेच्या २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाअंतर्गत जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या आशयाचे काम आहे. कामाचे नाव अपुऱ्या स्वरूपाचे आहे. या कामास अंदाजपत्रकी रक्कम कमी आहे. त्यामुळे नावात बदल आणि सुधारित अंदाजपत्रकी रक्कमेमध्ये बदल करण्यात आला. मूळ अंदाजपत्रक रक्कम १५० कोटी आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) १८ टक्के, सल्लागाराची फी ५ टक्के आणि १० वर्षे देखभाल दुरुस्ती करणे. नवीन दरसुचीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे कारण देत अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता अंदाजपत्रकी रक्कम १७२ कोटी केली. त्यामुळे जॅकवेल व पंप हाऊस बांधण्याच्या खर्चात २२ कोटींनी वाढ होणार आहे.

जॅकवेल व पंप हाऊस बांधणे या कामाच्या नावातही बदल केला आहे. भामा आसखेड धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, ॲप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत, यांत्रिकी, इन्स्ट्रुमेंटेशन, स्काडासह इतर आनुषंगिक कामे करणे आणि १० वर्षे देखभाल दुरुस्ती करणे असे नामकरण केले.