नऱ्हे येथे भक्तीमय वातावरणात काकड आरतीची सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऱ्हे येथे भक्तीमय वातावरणात काकड आरतीची सांगता
नऱ्हे येथे भक्तीमय वातावरणात काकड आरतीची सांगता

नऱ्हे येथे भक्तीमय वातावरणात काकड आरतीची सांगता

sakal_logo
By

भोर, ता. १० : नऱ्हे (ता. भोर) येथील विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात बुधवारी (ता. ९) भक्तीमय वातावरणात काकड आरतीची सांगता झाली. मंदिराला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई तसेच दीपोत्सवामुळे मंदिराचा परिसर उजळून निघाला होता.
ग्रामस्थांनी काकडा सांगतेप्रसंगी काढलेल्या मिरवणुकीत महिलांसह लहान मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. काकड्याचे भाटघर धरणात विसर्जन करून जलाशयातील पाण्याने श्रींना अभिषेक घालण्यात आला. दुपारी सत्यनारायण महापूजा करण्यात आली. कीर्तनकार माऊली महाराज खोपडे यांच्या सायंकाळी झालेल्या सुश्राव्य कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. यानंतर माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेव गोळे व सामाजिक कार्यकर्ते आप्पा गोळे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामस्थांतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतील मान्यवरांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गामस्थांतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते.
महिनाभर पार पडलेल्या धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी विश्‍वनाथ गोळे, प्रभाकर गोळे, सुदाम गोळे, पांडुरंग गोळे, अंजना गोळे, विद्या गोळे, जमुना गोळे, द्वारका गोळे, मंगल गोळे आदींनी परिश्रम घेतले. सुनील गोळे यांनी सूत्रसंचालन केले.
04158