पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी इंदापुरात ७५९ जणांची नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी 
इंदापुरात ७५९ जणांची नोंदणी
पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी इंदापुरात ७५९ जणांची नोंदणी

पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी इंदापुरात ७५९ जणांची नोंदणी

sakal_logo
By

इंदापूर, ता. १७ : पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील आठवडे बाजारातील सर्व पथविक्रेते भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते तसेच इतर सर्व प्रकारचे विक्रेते यांचे सर्वेक्षण केले असून, एकूण ७५९ पथविक्रेत्यांची नगर परिषदेकडे नोंद केली आहे.
या योजनेसाठी इंदापूर शहरास तीनशे सहा लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून, आतापर्यंत २४८ लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. त्यापैकी १३२ लाभार्थींची प्रकरणे मंजूर झाली असून, ११३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिलेला आहे. इंदापूर शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले. त्यासाठी सहायक प्रकल्प अधिकारी सुभाष ओहोळ, समुदाय संघटक योगिता सरगर किंवा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्ष इंदापूर नगरपरिषद यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केले.