गुनाट येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुनाट येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
गुनाट येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

गुनाट येथे विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

sakal_logo
By

गुनाट, ता. १७ : गुनाट (ता. शिरूर) येथील दत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून वनराई बंधारा बांधला. या बंधाऱ्यामुळे ओढ्याचे वाहून जाणारे पाणी अडवल्याने पाणीसाठा होऊन, परिसरातील भूजलपातळीही वाढणार आहे.
विद्यार्थ्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटविण्यासाठी विद्यालयाने गावातील ओढ्यावर वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविला.
यासाठी कृषी पर्यवेक्षक के. के. वीर, शिवाजी गोरे, कृषी सहायक जयवंत भगत यांनी विद्यार्थ्यांना बंधारा बांधण्याची तांत्रिक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वीट, दगड, वाळूच्या साह्याने ३७ फूट लांब व तीन फूट उंचीचा बंधारा एका दिवसात उभा केला. यामुळे ओढ्याचे वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यामुळे सुमारे २०० फूट लांबीपर्यंत साठवण्याची क्षमता वाढली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब धुमाळ, सतीश कोळपे, संगीता सोनवणे, पुष्पा वाघमोडे, वंदना कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.