वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी
वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी
वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी

वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी वरवंडची ग्रामसभा ठरली वादळी

sakal_logo
By

वरवंड, ता.१८ : येथील (ता.दौंड) ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायतीने सॅनिटाझरचे एक लाख ५८ हजारांचे काढलेले बोगस बिल, तंटामुक्त तसेच वनसमिती निवड आदी विविध विषयांच्या मुद्यांवरुन वादळी झाली. बोगस बीलप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सरपंच मिनाक्षी दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब दिवेकर, माजी सरपंच मीना दिवेकर, राहुल दिवेकर, ग्रामविकास अधिकारी जालिंदर पाटील, तानाजी दिवेकर, योगिनी दिवेकर, पोलिस पाटील किशोर दिवेकर, अर्चना रणधीर, योगिता दिवेकर, मंदाकिनी खोमणे, मीरा दिवेकर,फरदाना शेख, मारुती फरगडे, कांता टेंगले, गोरख दिवेकर, संजय दिवेकर, अशोक दिवेकर, एम.डी.फरगडे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी ग्रामसभेतील नियोजित विषयांचे वाचन केले. यावेळी ग्रामस्थ नंदू दिवेकर यांनी ग्रामपंचायतीने १ सॅनिटाझरचे बोगस बिल काढल्याचा मुद्दा उपस्थित केला तसेच प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी केली.
यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती निवड विषय मांडण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरुन गोंधळ उडाला. अखेर अध्यक्षपदी विठ्ठल दिवेकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. वनसमिती निवडीवरून गोंधळ उडाला.सन २०२३-२४ चे अंदाज पत्रक व एन वेळेचे विषय घेण्यात आले. यावेळी सरपंच दिवेकर, बाळासाहेब जगताप, संजय दिवेकर, किशोर दिवेकर आदींनी विविध विषयांवर मत मांडले.

05553