‘कात्रज’चे माजी संचालक रामदास दिवेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कात्रज’चे माजी संचालक
रामदास दिवेकर यांचे निधन
‘कात्रज’चे माजी संचालक रामदास दिवेकर यांचे निधन

‘कात्रज’चे माजी संचालक रामदास दिवेकर यांचे निधन

sakal_logo
By

वरवंड, ता. २ : जिल्हा दूध संघाचे (कात्रज डेअरी) व भीमा पाटस साखर कारखान्याचे माजी संचालक व वरवंड (ता. दौंड) गावचे माजी सरपंच रामदास जनार्दन दिवेकर (वय ७४) यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. गुरुवारी (ता. १) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिवेकर यांचा सन २०१८ मध्ये अपघात झाला होता. त्यात त्यांच्या मेंदूला मार लागला होता. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत सतत चढ-उतार होत होता. दहा दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, गुरुवारी रात्री साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले.
रामदास दिवेकर यांनी जिल्हा व तालुका पातळीवरील अनेक राजकीय पदे भूषविली होती. ते नागनाथ महाराज प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सहा मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. वरवंडच्या माजी सरपंच मीना दिवेकर या त्यांच्या पत्नी; तर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर हे त्यांचे पुत्र होत.