वरवंडच्या ग्राम शिक्षण संस्थेस बी. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवंडच्या ग्राम शिक्षण संस्थेस 
बी. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता
वरवंडच्या ग्राम शिक्षण संस्थेस बी. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता

वरवंडच्या ग्राम शिक्षण संस्थेस बी. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता

sakal_logo
By

वरवंड, ता. १६ ः वरवंड (ता. दौंड) येथील श्री. ग्राम शिक्षण संस्थेला फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाकडून बी. फार्मसी (पदवी- औषध निर्माण शास्त्र) या अभ्यासक्रमासाठी नुकतीच मान्यता मिळाली. किंबहुना राज्य शासनाच्या वतीने यंदापासूनच कोर्ससाठी ६० विद्यार्थांच्या प्रवेशास परवानी दिली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. विजय दिवेकर यांनी दिली.
ग्राम शिक्षण संस्थेच्या वतीने सन २०१९ रोजी ए. सी. दिवेकर डिप्लोमा (पदविका) फार्मसी कॉलेज सुरु केले. संस्थेचे संचालक डॉ. विजय दिवेकर व प्राचार्या अमिता डोंगरे यांचे उत्कृष्ट नियोजन, बारकावे यामुळे डी. फार्मसीचा शंभर टक्के निकाल लागला. या पार्श्‍वभूमीवर या संस्थेत बी. फार्मसी (पदवी) अभ्यासक्रमही सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, डॉ. विजय दिवेकर, अंकुश दिवेकर, गणपत दिवेकर यांनी बी. फार्मसी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. तसेच संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या समितीने तसेच केंद्र सरकारच्या फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाच्या समितीनेही संस्थेच्या सर्व भौतिक सोई-सुविधांची सर्वांगीण पाहणी केली. त्यानुसार केंद्र सरकारला सकारात्मक अहवाल सादर केला. परिणामी, अखेर संस्थेला बी. फार्मसी अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली.
याबाबत संस्थेचे संचालक डॉ. विजय दिवेकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात वरवंड गावात बी फार्मसी अभ्यासक्रम सुरु होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाची भावना आहे. संस्थेची तयारी पूर्ण झाली आहे. बी फार्मसी कॉलेजच्या सुसज्ज इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. तज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.’’

११७००