कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे - ॲड. पांडुरंग थोरवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे - ॲड. पांडुरंग थोरवे
कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे - ॲड. पांडुरंग थोरवे

कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे - ॲड. पांडुरंग थोरवे

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : ‘‘प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपले अधिकार काय आहेत, कायदा कसे काम करतो, हे माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान, माहिती असायला हवी. विद्यार्थ्यांनी ते शालेय वयापासूनच आत्मसात करायला हवे,’’ असे मत पुणे बार असोसिएशनचे (पीबीए) अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांनी व्यक्त केले.

ॲड. थोरवे यांना ‘सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’तर्फे ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते थोरवे यांना नुकतेच सन्मानित केले. याप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, कार्यकारी विकास अधिकारी इंजि. सिद्धांत चोरडिया, ‘सूर्यदत्त’च्या विधी विभागाच्या केतकी बापट आदी उपस्थित होते.