''अक्षरधारा बुक''तर्फे आजपासून मॉन्सून सेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''अक्षरधारा बुक''तर्फे आजपासून मॉन्सून सेल
''अक्षरधारा बुक''तर्फे आजपासून मॉन्सून सेल

''अक्षरधारा बुक''तर्फे आजपासून मॉन्सून सेल

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे ६ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत मॉन्सून सेलचे आयोजन केले आहे. अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. ६) सायंकाळी ६ वाजता बाजीराव रोड येथील आचार्य अत्रे सभागृहात या मॉन्सून सेलचे उद्‌घाटन होणार आहे. यानिमित्ताने पुस्तकांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

उद्‌घाटनानंतर अभिनेते श्रीराम रानडे आणि राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे, प्रभावळकर यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘मी (असा) कसा झालो’ या पुस्तकाच्या निमित्ताने या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून पुणेकर रसिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठीवडेकर यांनी केले आहे.

मॉन्सून सेलमधे ‘सकाळ’ प्रकाशनाचा विशेष सहभाग
मॉन्सून सेलमध्ये ‘सकाळ’ प्रकाशनाचा स्वतंत्र विभाग असून, ‘सकाळ’ प्रकाशनाच्या पुस्तकांवर थेट ३० टक्के सवलत मिळणार आहे. नुकताच प्रकाशित झालेला डॉ. सदानंद मोरे लिखित ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ हा ग्रंथ वाचकांना ३० टक्के सवलतीत मिळणार आहे. या महोत्सवादरम्यान अक्षरधारा आणि ‘सकाळ’च्या वतीने काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j24969 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..