पुण्यात १२ दिवसांत डेंगीचे ३८ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात १२ दिवसांत डेंगीचे ३८ रुग्ण
पुण्यात १२ दिवसांत डेंगीचे ३८ रुग्ण

पुण्यात १२ दिवसांत डेंगीचे ३८ रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शहरात पावसाला सुरवात झाल्यानंतर डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागात ३८ डेंगीच्या रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. दररोज तीन नवीन रुग्णांची भर पडल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले.

शहरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने पावसाच्या सरी पडत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात साचलेल्या स्वच्छ पाण्यावर आता डासांची पैदास सुरू झाली आहे. त्यातील एडिस इजिप्ती या डासांपासून पसरणारा डेंगीचा आजार आता शहरात वाढत असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीवरून दिसते. त्यामुळे कोरोनाबरोबरच महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे डेंगीची डोकेदुखी वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिया रुग्ण पुण्यात आहेत. त्या पाठोपाठ आता डेंगीचे निश्चित निदान झालेल्या आणि डेंगी संशयित रुग्णाची संख्या शहरात झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

सात महिन्यात डेंगीचे १८१ रुग्ण

शहरात १ जानेवारी ते ११ जुलै या दरम्यान आतापर्यंत डेंगीचे निश्चित निदान झालेल्या १८१ रुग्णांची नोंद महापालिकेत झाली आहे. तर, डेंगीचा संशय असलेल्या ८२९ रुग्ण आढळले. निश्चित निदान झालेल्या १८१ पैकी ३८ रुग्ण या महिन्याच्या ११ दिवसांमधील आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये यापेक्षा जास्त म्हणजे ४२ निश्चित निदान झालेल्या डेंगीच्या रुग्णांची नोंद महापालिकेत करण्यात आली. पण, ही संख्या पूर्ण महिन्यातील आहे. जुलैमध्ये जेमतेम ११ दिवसांमध्ये आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता आणि पडणारा पाऊस विचारात घेता, ही संख्या आणखी वाढेल, अशी शक्यता सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविली.

महापालिकेने बजावल्या ६८२ नोटीस

डासोत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्या शहरातील ६८२ आस्थापनांना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. घरात, घराच्या परिसरात डासांची पैदास होणार नाही, याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे. ही काळजी न घेणाऱ्या आस्थापनांविरोधात ही नोटीस बजावली आहे. एकट्या जुलैमध्ये २०८ नोटीस दिल्या आहे. यात सोसायट्यांसह वेगवेगळ्या आस्थापनांचा समावेश आहे.

प्रशासकीय शुल्क

डोसांची पैदास जबाबदार असलेल्या आस्थापनांकडून या वर्षी आतापर्यंत २८ हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आला. त्यापैकी दहा हजार रुपयांचे प्रशासकीय शुल्क जुलैमध्ये आतापर्यंत आकारण्यात आले असून, गेल्या महिन्यात जेमतेम एक हजार रुपयांचे यातून जमा झाले आहेत.

असा वाढतोय डेंगी

महिना ...... डेंगीचे निश्चित रुग्ण ........ संशयित रुग्ण ....... बजावलेल्या नोटीस
जानेवारी .... १६ ................................. १६० ..................... १२५
फेब्रुवारी ...... २८ ................................. ११७ ..................... ९०
मार्च ........... २२ ................................. १२८ ..................... ९३
एप्रिल ........ ४२ ................................. ८४ ..................... ४४
मे .............. १८ ................................. ५८ ..................... ६१
जून ........... १७ ................................. १५४ ..................... ६१
जुलै ........... ३८ ................................. १२८ ..................... २०८

...
“डेंगीच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आपले घर आणि घराच्या, सोसायटीच्या परिसरात पाणी साचून देऊ नका. साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास होण्याचा धोका असतो. त्यातून डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढते. तसेच, ताप, अंगदुखी, रॅश अशी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास तातडीने तपासणी करून घ्या,”
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j27328 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..