पुण्यातील खड्डे बुजविण्याचा वेग संथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील खड्डे बुजविण्याचा वेग संथ
पुण्यातील खड्डे बुजविण्याचा वेग संथ

पुण्यातील खड्डे बुजविण्याचा वेग संथ

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पहिल्यात पावसात शहरातील रस्त्यांची वाट लागल्याने मंगळवारी (ता.१२ ) रात्रीपासूनच मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या कामाचा वेग संथ असल्याने मंगळवारी दिवसभरात १३३ पैकी केवळ ५३ खड्डेच प्रशासनाने बुजविले आहेत.

आठवडाभरापासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे, त्यातच गेले दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. वर्षभर रस्त्यावर झालेल्या खोदकामानंतर महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ते चकाचक केल्याचे सांगितले होते. मात्र, पहिल्याच पावसात या रस्त्यांची पोलखोल झाली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांसह पेठांमधील गल्लीबोळ, उपनगरांमधील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरत आहेत.

पुणेकरांनी महापालिकेच्या या कामावर टीका सुरू केलेली असताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यापर्यंतही या तक्रारी पोचलेल्या आहेत. त्यांनी शहरातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेत शुक्रवारपर्यंत (ता. १५) खड्डे बुजविण्यासाठी नियोजन केले आहे.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश पथ विभागाला दिले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच पेठांमधील खड्डे बुजविण्यास सुरवात होईल. त्यानंतर उपनगरांमधील खड्डे बुजविले जातील. हे काम करताना त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे याकडेही लक्ष असणार आहे.

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असता पथ विभागाने सात कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यक्षेत्रात संथ गतीने काम सुरू केले आहे. या अधिकाऱ्यांना आज (मंगळवारी) दिवसभरात १३३ खड्डे बुजविण्याचे उद्दिष्ट दिलेले होते, पण त्यापैकी फक्त ५३ खड्डे बुजविण्यात आले आहेत.

हद्द (कार्यकारी अभियंता अनुक्रमांक) - खड्डे बुजविण्याचे लक्ष - बुजविलेले खड्डे
सिंहगड रस्ता-कात्रज (१) - २१ - ९
कोंढवा-वानवडी (२) - २५ - ८
पेठा (३) - ० - ०
हडपसर-मुंढवा (४) - १० - ०
बाणेर-बालेवाडी(५) - १९ -११
कोथरूड-वारजे (६) - ३२ - ७
संपूर्ण नगर रस्ता दोन्ही बाजू (७) - २६ - ११

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j27407 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..