
एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
महाळुंगे पडवळ, ता. १५ : महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे येणारी मुक्कामी एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी नाही.
एसटीच्या संपानंतर नारायणगाव आगाराची मंचर ते महाळुंगे पडवळ, मंचर, कळंब, महाळुंगे पडवळ ते साकोरे मार्गे घोडेगाव आदी एसटीच्या फेऱ्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. महाळुंगे पडवळ, साकोरे, रामवाडी, नांदूर, कळबंई आदी गावातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मंचर येथे येतात. मुक्कामी एसटी बंद असल्याने सकाळी महाविद्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना कसरत करावी लागते व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकही मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे एसटी पूर्ववत सुरु कराव्या, यासाठी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी यादव चासकर, राहुल पडवळ, अजित आवटे, अभिजित काळे यांनी नारायणगाव एसटी आगारातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. एसटी सेवा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
लवकरच एसटी सेवा पूर्ववत सुरु केली जाईल, असे नारायणगावचे एसटी आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j28190 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..