प्रागतिक व गतीशील विचारधारा लाभलेले कणखर व आदर्श व्यक्तिमत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रागतिक व गतीशील विचारधारा लाभलेले कणखर व आदर्श व्यक्तिमत्व
प्रागतिक व गतीशील विचारधारा लाभलेले कणखर व आदर्श व्यक्तिमत्व

प्रागतिक व गतीशील विचारधारा लाभलेले कणखर व आदर्श व्यक्तिमत्व

sakal_logo
By

प्रागतिक व गतिशील विचारधारा लाभलेले
कणखर व्यक्तिमत्त्व

अजितदादा म्हणजे चैतन्य व सकारात्मक ऊर्जेचा स्रोत. स्पष्टवक्तेपणा व परखडपणामुळे अनेकांना त्यांच्या कृतिशील, गतिमान व प्रभावी कार्यशैलीची ओळख पटते. अनेकवेळा दादांसोबत काम करण्याचा मला योग आला. विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांचे हित पाहता संस्थेला व महाविद्यालयाला येणाऱ्या अडचणींच्या प्रसंगी अजितदादांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे. उत्तम नियोजन, ठोस भूमिका, खंबीर निर्णय क्षमता इ. त्यांची अनेक रूपे त्यांच्या कार्यशैलीतून मला जाणवली. कणखर व तितक्याच संवेदनशील असलेल्या दादांकडे अनेकजण अडी अडचणी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्राधान्याने लक्ष घालून अजितदादा त्यांचे प्रश्न मार्गी लावतात व त्यामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. अशा लोकप्रिय अजितदादांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! पुढील राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा !

- जवाहर मोतीलाल शाह (वाघोलीकर)
अध्यक्ष, अनेकान्त एज्युकेशन सोसायटी, बारामती

माननीय अजितदादा पवार बारामती मतदारसंघातून १९९१ मध्ये खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. १९९१ ते १९९५ व नंतर १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर दादांनी कामे केली. १९९१ पासून २०१४ पर्यंत झालेल्या सहाही विधानसभा निवडणुकांत अजितदादा बारामती मतदारसंघातून विजयी झाले. खासदार, आमदार, राज्यमंत्री अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रिपदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रिपद भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वास लाभला आहे. त्यांनी ज्या ज्या खात्यांचा कार्यभार सांभाळला त्या सर्व कामांवर त्यांच्या कामाची छाप टाकली व संस्मरणीय असा त्यांचा कार्यकाळ ठरला. सर्व प्रशासकीय यंत्रणेवर दादांचा वचक व आदरयुक्त भीती असल्याने मोठमोठी कामे तितक्याच ताकदीने व झपाट्याने केली गेली.
अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतला. २०२० मध्ये संपूर्ण देशावरच नाही तर जगावर कोरोना महामारीचे महासंकट आले. नवे आव्हान समोर उभे राहिले. परंतु अशाही परिस्थितीत धीरोदात्तपणे उभे राहून लोकांचे दुःख समजून घेऊन त्यासाठी उपाययोजना करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ''मानवता'' हेच तत्त्व उराशी बाळगून अत्यंत बिकट व कठीण परिस्थितीतही वेळीच ठोस भूमिका घेऊन अनेक जीव वाचविण्याचे प्रयत्न त्यांनी केले व करीत आहेत. कोरोना रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले. बारामतीकर कधीच विसरू शकत नाहीत. दादांनी कधीही कुठलाही भेदभाव केला नाही. सत्ता असली काय किंवा नसली काय त्यांना काहीच फरक पडला नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी, गतिमान कार्यासाठी त्यांनी स्वतःला १७-१७ तास कामामध्ये झोकून दिले. अहोरात्र झटणाऱ्या दादांच्या कामामुळे जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले.

दादांनी कायापालट केल्याने संपूर्ण देशात तसेच ग्रामीण भागातले एक उत्कृष्ट व हरित शहर, एक आयडियल सिटी ख्याती बारामतीनगरीला मिळविली. बारामतीमध्ये प्रशस्त रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा, बागा, मध्यवर्ती इमारत, नवी भाजी मंडई, कॅनॉल रुंदीकरण, रिंगरोड, उड्डाण पूल, आरटीओ बिल्डिंग, महिलांसाठी प्रशस्त सर्व सुविधायुक्त मोफत उपचार करणारे रुग्णालय, बारामती व आसपासच्या परिसरातील जनतेसाठी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, मंडई शॉपिंग कॉम्पेक्स, प्रशासकीय इमारत, बारामती नगरपालिका, पंचायत समितीचे भव्य व देखणी इमारत, आयुर्वेदिक महाविद्यालय देखील सुरु केले याचा फायदा अनेकांना झाला. या सर्व कामांमध्ये दादांनी स्वतः लक्ष घालून प्रसंगी कठोर निर्णय घेऊन ही कामे पूर्णत्वास नेली.
कऱ्हा नदी पात्र सुशोभीकरण, शिवसृष्टी, नीरा डावा कालवा सुशोभीकरण, बटरफ्लाय वनउद्यान, पोलिस मुख्यालय, पोलिसांचे निवासस्थान इ. एस.टी. बसस्थानक, श्रीमंत बाबूजी नाईक इ. अनेक कामे हाती घेतली आहेत. शिक्षणामध्ये बारामती मागे रहायला नको व अत्याधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थांतर्गत शाळा, महाविद्यालयांची उभारणी केली. इंजिनिअरिंगसारख्या संस्था सुरू केल्या. बारामतीचा झालेला विकास पहात असताना दादांच्या कलात्मक दृष्टीचा प्रत्यय येतो. पर्यावरणाचा
समतोल राखण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी वृक्षलागवडीसाठी घेतलेल्या निर्णयामुळे पर्यावरणाच्या माध्यमातून चांगले आणि स्वच्छ वातावरण सर्वाना मिळत आहे. या त्यांच्या प्रगतशील विचार व कार्यामुळे बारामतीकरांचे भरभरून प्रेम त्यांनी मिळविले आहे.

केवळ बारामतीमध्येच नाही तर पिंपरी चिंचवडला देखील देशाची मॉडेल सिटी बनविण्याचे श्रेय अजितदादांनाच आहे. प्रशस्त रस्ते, उड्डाण पूल, ग्रेड सेपरेटर, सर्वत्र हिरवळ इ. अनेक विकासकामे दादांनी केली व जनतेच्या दैनंदिन अडचणी सोडविल्या. जिल्ह्याच्या नैसर्गिक, भौगोलिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक विकासामध्ये कायम भर घातली. त्यांचे ज्ञान, अनुभव व प्रत्येक समाज घटकाला समजून घेण्याची क्षमता यामुळे दादांना सर्वजण आपले मानतात. समाजमनात काय दडलंय हे अचूकपणे ओळखून त्या दिशेने पावले टाकून व निर्णयप्रक्रियेत व्यापक समाजहित जोपासण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत आहेत. भूसंपादन, अतिक्रमणविरोधी कारवाईसारखे कठोर निर्णय राबविताना होणाऱ्या परिणामांची फिकीर दादांनी केली नाही. विकास कामे करताना कठोर निर्णय घ्यावेच लागतात. परंतु भविष्यात त्याचा सर्वांना याचा फायदाच होतो. हे अजितदादांनी दाखवून दिले. शेती व शेतीपूरक व्यवसायास कायम महत्त्व दिले. योग्य ते निर्णय घेतले त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास होऊ शकला. सहकारांच्या माध्यमातून कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या उभ्या केल्या व अनेकांना रोजगार मिळवून दिला. अजितदादा ऊर्जामंत्री असताना महाराष्ट्र भारनियमनमुक्त केला. शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. अजितदादा फलोत्पादनमंत्री असताना अनेक तज्ज्ञांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून अनेक शेतकरीभिमुख असे फलोत्पादन योजनांवर निर्णय घेतले. राज्याच्या विधिमंडळात शेतीच्या प्रश्नांवर पोटतिडकीने आपले विचार त्यांनी मांडले. क्रीडाक्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होण्यामध्ये अजितदादांचे योगदान मोठे आहे. नवनवीन गोष्टींची माहिती करून घेऊन त्या जनतेपर्यंत कशा पोहोचतील याच ध्येयाने प्रेरित होऊन दादा आजही त्याच ऊर्जेने काम करीत आहेत. अजितदादांच्या भावी व्यक्तीगत व राजकीय
वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

(शब्दांकन - सौ.सुषमा संगई)

फोटो ओळ : जवाहर शहा (वाघोलीकर) यांच्या सोबत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार.
७८८१२

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22j29660 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..