इनोव्हेटिव्ह सेवियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनोव्हेटिव्ह सेवियर
इनोव्हेटिव्ह सेवियर

इनोव्हेटिव्ह सेवियर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ः रात्री वाहन चालवीत असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अतिशय तीव्रतेचा उजेड आपल्या वाहनावर पडतो. पर्यायाने चालकाच्या डोळ्यांना आठ सेकंदापुरते अंधत्व येते. असे होऊ नये म्हणून वाहनांमध्ये अप्पर डिप्परची सोय केलेली असते. तरीही बहुतांश चालकांचा बेमुर्वतपणा, गाफीलपणा दुसऱ्याच्या जिवावर बेततो...मात्र, आता ही समस्या राहू नये, असे उपकरण निगडीतील सिटी प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आहे. ते प्राथमिक स्तरावर असून त्याची चाचणी यशस्वी ठरली आहे.

या उपकरणाचे नाव आहे -ऑटोमॅटिक अप्पर डिप्पर सिस्टीम. यामध्ये जेव्हा आपली गाडी समोरून येणाऱ्या गाडीच्या प्रकाशाची तीव्रता टिपून घेते. मग आपल्या गाडीमध्ये लावलेला सेन्सर तीन वेळा ब्लिंक म्हणजे चालू बंद होतो. त्यामुळे समोरच्या वाहन चालकाला सिग्नल मिळतोच, शिवाय आपल्याही गाडीचा डिप्पर ॲटोमॅटिक सुरू होतो. जर तशीच सिस्टीम म्हणजेच सेन्सर जर त्या समोरच्या गाडीत असेल तर ऑटोमॅटिक दोन्ही गाड्यांचे डिप्पर सुरू होतील आणि गाडी क्रॉस झाल्यानंतर आपोआप अप्पर सुरू होतील. यासाठी प्रोजेक्टमध्ये एलडीआर म्हणजेच लाईट डिपेंडंट सेन्सरचा वापर केला आहे.

- सुचलेल्या कल्पनेचा केला विस्तार
इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेले मनस्वी क्षिरसागर, प्रियाल खांडेकर, प्रत्यूष पाटील चर्चा करत असताना रात्री समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशाचा डोळ्यांना त्रास होतो असा विषय निघाला. मग त्यांनी शाळेच्या सर्व बस चालकांच्या मुलाखती घेतल्या. रात्री लांब पल्ल्यावर निघणाऱ्या अनेक बस चालकांशी बोलले. धाब्यावर ट्रक चालकांकडून माहिती दिली. यातूनच अप्पर डिप्पर या प्रकल्पाची संकल्पना समोर आली.

शाळेतील अटल टिंकरिंग लॅब मार्फत शिकविलेला डिझाईन थिंकिंग हा फंडा प्रकल्प करताना उपयोगात आणला. डिझाईन थिंकिंगमध्ये कुठल्याही समस्येवर एम्पथी, डिफाइन, आयडीएशन, प्रोटोटाइप व टेस्टिंग अशा स्टेजेसमधून विविध अडचणींवर उपाय शोधले. शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यातूनच ‘ऑटोमॅटिक अप्पर डिप्पर सिस्टीम’ची निर्मिती झाली.
.....................
कोट

आम्ही तयार केलेली यंत्रणा स्वस्त, सोपी आणि सहज उपलब्ध होणारी आहे. शिवाय अपघातरोधक असल्याने परीक्षकांना खूप आवडली. रात्रीच्या वेळेस घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी प्रवाशांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. भविष्यामध्ये आम्ही त्याचे पेटंट करता येईल का? आता विचार करीत आहो. आम्हाला खात्री आहे आमच्या यंत्रणेचा वापर करून प्रवासी सुखरूप आणि आनंदी प्रवास करतील.
- मनस्वी क्षिरसागर, प्रियाल खांडेकर व प्रत्यूष पाटील. विद्यार्थी
......
कोट
नुकतीच स्मार्ट इंडिया हॅकेथानसाठी आवेदनपत्रे मागविली होती. त्यामध्ये आपण काय करू शकतो हे ठरवत असताना विद्यार्थ्यांसमोर अनेक विषय आम्ही मांडले. तेव्हा मुलांनी अप्पर डिप्पर हा प्रोजेक्ट आपण करू शकतो ही कल्पना मांडली आणि प्रोजेक्टला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध बस चालक व मोटार चालकांशी संवाद साधला. त्यातून त्यांना ही समस्या किती मोठी आहे हे कळले! हळूहळू याच प्रोजेक्टवर काम करायचे पक्के झाले. मग आरडीनोच्या साह्याने l-dr सेन्सर वापरून हा प्रकल्प बनविण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
- प्रा. भावेश अहिरे, मेंटर, सिटी प्राइड स्कूला

--
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेमध्ये सिटी प्राइड स्कूलने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके वेगळ्या गटात पटकाविली आहे. त्यातील हा एक प्रकल्प आहे. आकुर्डी येथील डी .वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या सोहळ्यामध्ये तीन विद्यार्थ्यांच्या या टीमला प्रत्येकी रुपये पंचवीस हजाराचे बक्षीस, प्रमाणपत्र व पारितोषिक
देण्यात आले.