यवतच्या पालखी तळाला अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवतच्या पालखी तळाला अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट
यवतच्या पालखी तळाला अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

यवतच्या पालखी तळाला अपर जिल्हाधिकाऱ्यांची भेट

sakal_logo
By

यवत, ता. ७ ः पुणे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज यवत येथे पालखी तळाला भेट दिली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी पालखी मुक्कामाच्या काळात येणाऱ्या संभाव्य अडचणींचा आढावा घेतला.
यवत येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांची संभाव्य संख्या मोठी असणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले. त्यादृष्टीने सर्वच विभागांनी तयारी ठेवा अशी सूचनाही त्यांनी दिल्या. दौंड- पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश धस, पोलिस निरीक्षक नारायण पवार, विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, यवतचे सरपंच समीर दोरगे, कासुर्डीच्या सरपंच अधश्री टेकवडे प्रामुख्याने उपस्थित होते.
वारीच्या काळात पाण्याचे स्रोत, हॉटेल, ढाबे तपासणे, निर्जंतुकीकरण करणे, शौचालयाच्या सुविधा वाढवणे, वाहतूक वळविण्यासाठी उपाययोजना करणे, गाव व रस्त्यांची स्वच्छता करणे, वीज जाणार नाही याची दक्षता घेणे, वारकऱ्यांनी अधिकाधिक सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

अशा असणार सुविधा
१) यवतला वारकऱ्यांना अंघोळीसाठी व्यवस्था
२) मोबाईल चार्जिंगसाठी चार्जर स्टेशन
३) शौचालय उपलब्ध करून देणाऱ्या घरांवर पांढरे निशान
४) दिंड्यांना वीजजोड उपलब्ध करून देणार
५) धोकादायक वीजवाहक तारा टाकणार
६) पालखी मुक्कामाच्या ठिकाणी एक जादा रोहित्र (डीपी)

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22k79428 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top