
उरुळी कांचनच्या माजी उपसरपंचांना मारहाण
उरुळी कांचन, ता. १६ : उरुळी कांचन येथील तुपे वस्ती येथे रस्त्याच्या कामाच्या वादातून चार- पाच जणांनी लाकडी दांडके व दगडांनी माजी उपसरपंचांना जबर मारहाण केल्याची घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. भाऊसाहेब महादेव तुपे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) असे मारहाण झालेल्या माजी उपसरपंचांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी कांचन येथील तुपे वस्तीवरील ३०० मीटर रस्त्याचे काम रखडलेले असून या रस्त्यासाठी जागेचा वाद चालू होता. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने समाजकल्याण निधीतून ३ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम प्रत्यक्ष भाऊसाहेब तुपे हे तेथे हजेरी लावून पाहत असताना या ठिकाणी अचानक चार- पाच जणांनी तुपे यांना जाब विचारून त्यांना लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर हल्ला करून पसार झाले. डोक्यात दगडाचा मार लागल्याने भाऊसाहेब तुपे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m20873 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..