
उरुळीतील विद्यालयाचा निकाल ८७.६१ टक्के
उरुळी कांचन, ता. ९ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावीचा निकाल ८७.६१ टक्के लागला. त्यात कला शाखेचा निकाल ६९.८१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८५.६० टक्के; तर विज्ञान शाखेचा निकाल ९६.५५ टक्के लागला. तसेच, किमान कौशल्य शाखेचा निकाल ९८.६० टक्के लागला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली.
विद्यालयातील एकूण ६४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ५६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेला १०६ विद्यार्थी बसले होते. त्यातील ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेसाठी २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये २२६ विद्याथी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेसाठी २०३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यामध्ये १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, किमान कौशल्य शाखेत ६७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यातील ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
डॉ. अस्मिता विद्यालयाचे यश
डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी एकूण ११८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ते सर्व उत्तीर्ण झाले. ११६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याची माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, प्राचार्या रोहिणी जगताप, विभागप्रमुख प्रा. परभणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m78108 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..