दौंडच्या केंद्र शाळांमध्ये शिक्षणाची भरली यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडच्या केंद्र शाळांमध्ये शिक्षणाची भरली यात्रा
दौंडच्या केंद्र शाळांमध्ये शिक्षणाची भरली यात्रा

दौंडच्या केंद्र शाळांमध्ये शिक्षणाची भरली यात्रा

sakal_logo
By

यवत, ता.१५ः येथील (ता. दौंड) केंद्रशाळेसोबत सर्व प्राथमिक शाळांमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. नव्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवसाची सुरवात आनंददायी व्हावी यासाठी, जुन्याविद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वच शाळांमध्ये या उत्सवामुळे शिक्षणाची जणू यात्राच भरली की काय असे वाटत होते.
यवत येथील प्राथमिक शाळा क्र. १ व क्र. २ मध्ये प्रवेश पूर्व मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी जुने विद्यार्थी व शिक्षकांनी नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. रांगोळीच्या पायघड्या, फेटेधारी मुले, फुग्या- फुलांच्या सजावटीने वातावरणात चांगलेच रंग भरले होते.
या वेळी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले. खाऊ वाटप करण्यात आले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या निशा शेंडगे, सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, माजी उपसरपंच सदानंद दोरगे, शाला समिती अध्यक्ष जोया सय्यद, धनंजय दोरगे, केंद्रप्रमुख प्रणय कुमार पवार शालासमिती सदस्य व पालक उपस्थित होते. शाळा क्र. १ चे मुख्याध्यापक रामभाऊ दोरगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर शाळा क्र. २ च्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुतवळ यांनी आभार मानले.

71292

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m80208 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top