वाल्ह्यातील शिबिरात १३५ जणांची नेत्र तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यातील शिबिरात 
१३५ जणांची नेत्र तपासणी
वाल्ह्यातील शिबिरात १३५ जणांची नेत्र तपासणी

वाल्ह्यातील शिबिरात १३५ जणांची नेत्र तपासणी

sakal_logo
By

वाल्हे, ता. १७ ः वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गुरुवारी (ता. १६) हडपसर येथील एच. व्ही. देसाई नेत्र रूग्णालय यांच्या वतीने मोतीबिंदू भिंगरोपण बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्‍घाटन सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात १३५ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. आवश्‍यकतेनुसार चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी २२ जणांना मोतीबिंदूवरील उपचारासाठी दोन दिवसात पाठविण्यात येणार असल्याचे खवले यांनी सांगितले.
या प्रसंगी उपसरपंच अंजली कुमठेकर, सत्यवान सूर्यवंशी, त्रिंबक भुजबळ, हनुमंत पवार, संदेश पवार, मोहन ढोबळे, सूर्यकांत भुजबळ, शंकर पवार, किरण कुमठेकर आदी उपस्थित होते.
डॉ. अविनाश आडके यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन तर ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m80477 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top