
गुरूकुलासाठी स्वयंपाकाची भांडी दान
वाल्हे, ता. १६ : सध्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळा, संस्था, मंदिरांना दान करण्याकडे लोकांचा मोठा कल वाढला असून कार्यक्रमामध्ये होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देऊन वस्तुरूपाने दान केल्यास त्याचा अपव्यय देखील टळतो. एखाद्याच्या आठवणी प्रित्यर्थ वस्तू दान केल्याने त्याची आठवणही चिरंतन राहते. नुकतेच वाल्हे (ता. पुरंदर) नजीक माळवाडी येथील बेकरी व्यावसायिक प्रवीण भुजबळ यांनी महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या गुरूकुलासाठी स्वयंपाकाची भांडी दान केली आहेत.
माळवाडी येथील प्रवीण भुजबळ यांचे वडील सुधाकर दगडू भुजबळ यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी अनाठायी खर्चाला फाटा देत नुकतेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळानजिक असलेल्या महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या गुरूकुलासाठी त्यांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असणारी स्वयंपाकाची भांडी भेट दिली. ही भांडी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक महाराज पवार यांनी स्वीकारली. यावेळी सचिव संदीप दुर्गाडे, विमल सुधाकर भुजबळ, अमृता भुजबळ, पांडुरंग पवार, बाळासाहेब गिरमे, रामचंद्र पवार, गजानन पवार, राहुल भुजबळ आदि उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m80604 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..