वाल्ह्यात पालखीच्या मुक्काची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्ह्यात पालखीच्या मुक्काची जय्यत तयारी
वाल्ह्यात पालखीच्या मुक्काची जय्यत तयारी

वाल्ह्यात पालखीच्या मुक्काची जय्यत तयारी

sakal_logo
By

वाल्हे, ता. २१ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथे २७ जून रोजी येत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यात काही कसूर राहू नये, यासाठी पुरंदर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.
पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांनी पालखीतळावर चाललेल्या विविध कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. मात्र, अजूनही रेल्वे प्रशासनाचे काम अपुरे असल्याने पालखी सोहळ्याला येण्या-जाण्यास अडथळा होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २४ जून रोजी पुरंदर तालुक्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. सोमवारी (ता. २०) या तयारीची माहिती घेण्यासाठी पुरंदर प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी अमर माने, सरपंच अमोल खवले, चंद्रकांत दुर्गाडे, धनंजय पवार, आनंद पवार, हमीद शेख, सागर पवार आदी उपस्थित होते.
यावेळी पालखीतळावर सुरू असलेल्या सपाटीकरण, स्वच्छतेच्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. तर, विद्युतीकरण, रेल्वे क्रॉसिंगच्या अपुऱ्या कामांबाबत असमाधान व्यक्त करताना ही कामे पालखीपुर्वी पूर्ण करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. वारकऱ्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था व परिसरातील विहिरींचे निर्जंतुकीकरण आदी कामांची माहिती घेण्यात आली.
यावेळी सुकलवाडीचे माजी उपसरपंच धनंजय पवार यांनी पालखी काळात सुकलवाडी ते झिरीपवस्ती या पर्यायी मार्गातील रस्त्याचे काम करण्यासंदर्भात मागणी केली. वाल्हे पालखी तळाशेजारील विहिरी व टॅंकर भरण्याच्या सोई-सुविधांबद्दल वाल्ह्याचे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्रुटींविषयी मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी राजाराम शेडगे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m82000 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top