दोन मोटारींची समोरासमोर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन मोटारींची समोरासमोर धडक
दोन मोटारींची समोरासमोर धडक

दोन मोटारींची समोरासमोर धडक

sakal_logo
By

शिरूर, ता. २२ : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात हे पुणे-नगर रस्त्यावर शिरूरपासून जवळच बोऱ्हाडे मळ्यात झालेल्या मोटार अपघातात गंभीर जखमी झाले. दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले.
ॲड. थोरात (वय ६१, रा. आमदाबाद, ता. शिरूर) यांच्यासह त्यांच्या मोटारीचा चालक अप्पा मेंगवडे (वय ३०, रा. माठ, ता. श्रीगोंदा, जि. नगर) व दुसऱ्या मोटारीतील गणेश शिवदास पोकळे (वय ४०), स्वाती गणेश पोकळे (वय ३२), ओमराज रमेश पोकळे (वय १२) व शरद सर्जेराव पोकळे (वय ३०), अंजू शिवदास पोकळे (वय ७०), राघोबा अर्जुन मेघवंडे (वय ४२), विमल जनार्दन भावटनकर (वय ४७), दिव्या प्रदीप सुरवसे (वय ४५), सारीका रमेश पोकळे (वय ३८, सर्व रा. बीड) हे जखमी झाले. यातील ॲड. थोरात यांच्यासह काही जखमींवर शिरूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविले आहे.

ॲड. थोरात हे कारखान्याच्या इनोव्हा मोटारीतून पुण्याला गेले होते. तेथून परतत असताना दुपारी तीनच्या सुमारास बोऱ्हाडे मळ्यातील चौकात एक मोटार अचानक रस्त्यात आल्याने तिला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक मेंगवडे यांचा मोटारीवरील ताबा सुटला व ती विरुद्ध दिशेला येऊन पुण्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीपवर आदळली.ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर होऊन इंजिन फुटले.

००६५८

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m83151 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top