वरवंडच्या पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवंडच्या पालखी तळावर
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
वरवंडच्या पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

वरवंडच्या पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

sakal_logo
By

वरवंड, ता. २४ : वरवंड (ता. दौंड) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (ता. २६) मुक्कामी येणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ सज्ज झाले आहे. गावात स्वच्छता व इतर नियोजनाबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने पालखी तळावर व ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच मीना दिवेकर व उपसरपंच बाळासाहेब जगताप यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षाच्या खंडानंतर पालखी सोहळ्याचे वरवंड येथे आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, आरोग्य, महसुल आदी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. पालखीतळाची स्वच्छता केली आहे. तसेच, परिसरात पावसामुळे चिखल होऊ नये म्हणून मुरुमीकरण केले आहे. चौकापासून पालखीतळापर्यंत आवश्यक ठिकाणी विजेच्या खांबावर विजेसाठी हॅलोजन बसविले आहेत. वारकऱ्यांना अंघोळीसाठी तीनशेपेक्षा जास्त शॉवर बसविले आहेत. पिण्याच्या पाण्याचे टॅंकर भरण्यासाठी दोन ठिकाण निवडण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने परिसरात हॉटेल, खाद्य पदार्थ दुकान यांची तपासणी केली आहे. पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच, हॉटेल व्यावसायिक व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. पोलिस, महसुल, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखी तळाची पाहणी केली आहे, अशी माहिती सरपंच मीना दिवेकर यांनी दिली.

७३६०५

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m83725 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..