ग्रामप्रदक्षिणेनंतर यवतमधून पालखीला निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामप्रदक्षिणेनंतर यवतमधून पालखीला निरोप
ग्रामप्रदक्षिणेनंतर यवतमधून पालखीला निरोप

ग्रामप्रदक्षिणेनंतर यवतमधून पालखीला निरोप

sakal_logo
By

यवत, ता. २६ : यवत येथील मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज वरवंड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. तत्पूर्वी रविवारी सकाळी आठ वाजता पालखीची ग्रामप्रदक्षिणा सुरू झाली. सालाबादप्रमाणे गावातील भाविक तरुणांनी पालखी खांद्यावर घेऊन भैरवनाथ मंदिर ते विद्या विकास मंदिर या मार्गाने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. या काळात ठिकठिकाणी स्थानिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यवत येथे शनिवारी (ता. २५) सायंकाळी आठच्या सुमारास पालखी सोहळा पोचला. या वेळी येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पावार यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली.

सोहळ्याबरोबर आलेल्या वारकऱ्यांसाठी पिठले भाकरीचे जेवण गावाच्या वतीने देण्यात आले. प्रशासनाच्या सहकार्याने सोहळ्याचा मुक्कम सुरक्षित पार पडला. पालखी फुलांनी सुशोभित केलेल्या रथात ठेवण्यात आली. सोहळ्याने दुपारी भांडगाव येथे विसावा घेतला. त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास सोहळा वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाला.

७९७८४

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m83965 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top