इंदापुरातील शिवसेनेचे ठाकरेंना समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरातील शिवसेनेचे ठाकरेंना समर्थन
इंदापुरातील शिवसेनेचे ठाकरेंना समर्थन

इंदापुरातील शिवसेनेचे ठाकरेंना समर्थन

sakal_logo
By

इंदापूर, ता. २६ : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या विरोधात इंदापुरातील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध केला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर इंदापूर येथील शिवसेना ठाम असल्याचा निर्वाळा देण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, उपजिल्हा संघटिका पुष्पा घोरपडे, तालुका संघटिका सुरेखा लोहार यांची भाषणे झाली. या वेळी सचिन इंगळे, अविनाश खंडाळे, अप्पा डोंगरे, मंदार डोंबाळे, धोंडिराम सोनटक्के, रामचंद्र पाचंगणे, अशोक देवकर, योगेश वाघमोडे आदी उपस्थित होते.

इंदापूर : नगर परिषदेच्या प्रांगणात निषेध करताना इंदापूर शिवसेनेचे पदाधिकारी.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22m84074 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..